संविधानाचे उल्लंघन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. देशाचा संघिय साचामध्ये बदल करुन पंतप्रधान राज्य सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करत असून यासंदर्भात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार असल्याचे ममता बॅनर्जींनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मोदी सरकार राज्य सरकारच्या अनुमती शिवाय राज्य सरकारच्या वित्तीय योजनांच्या आराखड्यात बदल करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकार राज्य सरकारच्या कारभारात ढवळाढवळ करत असेल तर राज्य सरकारला महत्त्वच उरत नसल्याचे ममता यावेळी म्हणाल्या. यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी पंतप्रधान विमा योजनेवर हस्तक्षेप घेतला होता. पंतप्रधान विमा योजनेमध्ये राज्य आणि केंद्र यांच्याकडून समभागात हिस्सेदारी आहे. त्यामुळे या योजनेला पंतप्रधान विमा योजना नावाला आक्षेप नोंदविण्यात आला होता.