News Flash

यशवंत सिन्हा यांचे टीकेवरून घूमजाव

मी असे काहीही बोललो नसून वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे.

| February 1, 2016 01:19 am

ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा

मोदी सरकारचे येत्या निवडणुकीत पानिपत होईल, असे वक्तव्य करून भाजपला घरचा आहेर देणारे ज्येष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी घूमजाव केले आहे. मी असे काहीही बोललो नसून वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे. डिफिकल्ट डायलॉग या कार्यक्रमात सिन्हा यांनी मोदी यांचे नाव न घेता केंद्र सरकारवर टीका केली होती. मात्र, रविवारी त्यांनी घूमजाव केले. ते म्हणाले की, माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले. भारतीय समाज सर्व काही लक्षात ठेवतो. याचा फटका भविष्यात बसू शकतो. जनता यांनाही धूळ चारेल. केवळ पुढील निवडणुकीपर्यंत प्रतीक्षा करावी. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांना जनतेने धडा शिकविला होता. या परिस्थितीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सिन्हा म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2016 1:19 am

Web Title: modi govt may meet same fate as that of indiras yashwant sinha
टॅग : Yashwant Sinha
Next Stories
1 पीक विमा योजनेचा लाभ घ्या
2 ब्रिज बेदी यांचे निधन
3 सीरियातील शांतता चर्चेत अडथळ्यांना सुरुवात
Just Now!
X