पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक व सामाजिक परिषदेला संबोधित केलं. युनोच्या सुरक्षा परिषदेत भारताची अस्थायी सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केलं. यावेळी मोदी यांनी भारत करत असलेल्या विकासावर प्रकाशझोत टाकला.

Live Blog

21:01 (IST)17 Jul 2020
गरजू भारतीयांना थेट आर्थिक मदत

भारत प्रत्येक क्षेत्रात पुढे पाऊल टाकत आहे. आम्ही महिलांना सशक्त बनवण्यासाठी सर्वांगीण दृष्टीनं प्रयत्न करत आहोत. मागील सहा वर्षांच्या काळात आम्ही थेट अर्थ साहाय्याच्या माध्यमातून ४० कोटी बँक खाती उघडली आहेत. त्याचबरोबर गरजू लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा केले आहेत, असं मोदी म्हणाले.

20:58 (IST)17 Jul 2020
७५ व्या स्वातंत्र्य दिनापर्यंत प्रत्येक भारतीयाला घर

सगळ्यांना अन्न देण्यासाठी सरकारनं अन्न सुरक्षा योजना आणली. या अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून ८३० मिलियन भारतीयांना आज लाभ मिळत आहे. पंतप्रधान घरकुल योजनेच्या माध्यमातून २०२२ पर्यंत जेव्हा भारत ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असेल, तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर स्वतःचं छत असेल.

20:53 (IST)17 Jul 2020
सबका साथ, सबका विकास हेच ध्येय

२०३० पर्यंतचा निश्चित केलेले उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी भारत पूर्णपणे प्रयत्न करीत आहे. आम्ही विकसित देशांची मदत करत आहोत. आमचं उद्दिष्टच सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास आहे, असं मोदी म्हणाले.

20:51 (IST)17 Jul 2020
आत्मनिर्भर भारत अभियान -मोदी

करोना व लॉकडाउनमुळे संकटात आलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आम्ही पॅकेज जाहीर केलं. तसेच आत्मनिर्भर भारत अभियानही सुरू केलं आहे.

20:49 (IST)17 Jul 2020
करोनाविरोधात जनआंदोलन -मोदी

आम्ही सर्वच नैसर्गिक आपत्तींना तोंड दिलं आहे. कोविडसाठी भारतानं फंड उभा केला. त्याचबरोबर करोनाविरोधातील लढाईला आम्ही जनआंदोलन बनवलं आहे, असं मोदी म्हणाले.

20:49 (IST)17 Jul 2020
गरीबांना घरं, उपचारासाठी आयुष्यमान भारत योजना

भारतानं गरिबांसाठी घरं बनवली. गरिबांना उपचारासाठी आयुष्यमान भारत योजना चालवली. मागील पाच वर्षात भारतानं ३८ मिलियन कार्बन उत्सर्जन कमी केलं आहे. त्याचबरोबर सिंगल यूज प्लास्टिकसाठी अभियान हाती घेतलं आहे, असं मोदी म्हणाले.

20:41 (IST)17 Jul 2020
ECOSOCच्या उभारणीत भारताचंही योगदान

भारताने नेहमीच संयुक्त राष्ट्र संघाच्या विकास कामांचा आणि ECOSOC चं सक्रियपणे समर्थन केलं आहे. ECOSOCचे पहिले अध्यक्ष हे एक भारतीय होते. ECOSOCच्या उद्दिष्टांना आकार देण्यात भारताचंही योगदान आहे, असं मोदी म्हणाले.

20:38 (IST)17 Jul 2020
संयुक्त राष्ट्र संघानं १९३ देशांना एकत्र आणलं

यूएनच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी परिषदेला संबोधित करताना म्हणाले,"दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्राच्या पहिल्या ५० सदस्य देशांपैकी भारत एक होता. त्यानंतर बरंच काही बदललं आहे. आज संयुक्त राष्ट्र संघानं १९३ देशांना एकत्र आणलं आहे. युनोच्या सदस्यत्वाबरोबरच देशांकडून अपेक्षाही वाढल्या आहेत," असं मोदी म्हणाले.

20:33 (IST)17 Jul 2020
बहुभाषिकतेसमोर आजही अनेक आव्हानं -मोदी

आज बहुभाषिकतेसमोर आज अनेक आव्हान उभी आहेत. जर भारत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यात यशस्वी झाला, तर जागतिक उद्दिष्टांही पुढे जातील. म्हणून आम्ही आपल्या लोकांना शिक्षित करुन संपूर्ण समाजाचा दृष्टीकोण स्वीकारला आहे, असं मोदी म्हणाले.

20:12 (IST)17 Jul 2020
अनेक विषयावर करणार भाष्य...

पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक व सामाजिक परिषदेत बोलण्याची माहिती देण्याबरोबरच अनेक विषयांवर संवाद साधणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे मोदी यांच्या भाषणात कोणते मुद्दे असणार हे सगळ्यांसाठी औत्सुक्याचं असणार आहे.

20:10 (IST)17 Jul 2020
चीनविषयी काय भूमिका मांडणार?

देश सध्या करोनाच्या संकटातून जात आहे. त्याचबरोबर सीमेवरही तणाव निर्माण झालेला आहे. त्यामुळे चीनसोबतच्या सीमावादावर मोदी काय बोलणार हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. कारण एकीकडे तणाव दूर करत असताना भारतानं चिनी अॅप बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

20:07 (IST)17 Jul 2020
मोदी ट्विट करून दिली होती माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्विट करून संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक व सामाजिक परिषदेत विविध विषयांवर बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.