03 March 2021

News Flash

‘मजबूर नाही तर मजबूत सरकारची गरज’, ९०० कलाकारांचा मोदींना पाठिंबा

कला क्षेत्रात मोदींचे समर्थक आणि मोदीचे विरोधक असे दोन गट पडले आहेत

देशभरात आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांत आज मतदान होत आहे. यावेळी मोदी सरकार आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करण्याचं आवाहन ९०० कलाकारांनी केलं आहे. या ९०० कलाकारांनी आवाहन करणारं एक निवेदन जाहीर केलं आहे.

काही दिवसांपूर्वी मोदी सरकार आणि त्यांच्या मित्र पक्षांना मत न देण्याचं आवाहन करणारं एक पत्र ६०० कलाकारांनी दिलं होतं. या पत्राला एक आठवडाही उलटत नाही. तोच ९०० कलाकार मोदींच्या पाठिंब्यासाठी उभे राहिले आहेत. त्यामुळे सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कला क्षेत्रात मोदींचे समर्थक आणि मोदीचे विरोधक असे दोन गट पडले आहेत.

नसिरूद्दीन शहा, अमोल पालेकर, मकरंद देशपांडे, गिरिष कर्नाड, उषा गांगुली यांच्यासह देशभरातील ६०० कलाकारांनी मोदी आणि त्यांच्या मित्रपक्षांना मत न देण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या या निवेदनाला पंडित जसराज, विवेक ओबेरॉय, रिटा गांगुली, पल्लवी जोशी, शंकर महादेवन, अनुराधा पौडवाल, विजय पाटकर यांच्यासह ९०० कलाकारांनी प्रत्युत्तर देत मोदींना पाठिंबा दर्शविला आहे.

पाकपुरस्कृत दहशतवादासमोर गुढघे टेकून आहे त्या परिस्थितीला सामोरं जात. उघड्या डोळ्यांनी देशाही हानी होऊ देणाऱ्या आधीच्या सरकारला मत देण्यापेक्षा दहशतवादाशी थेट दोन हात करणाऱ्या मोदी सरकारची देशाला गरज आहे. त्यामुळे ‘मजबूर सरकार ऐवजी मजबूत सरकारची’ देशाला पुन्हा एकदा गरज असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

त्यासोबतच गेल्या पाच वर्षात देशभरात अनेक सकारात्मक बदल घडले असून कोणतही भ्रष्टाचाराचं मोठं प्रकरण समोर आलेलं नाही. त्यामुळे देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुन्हा एकदा मोदी यांनाचा पाठिंबा देण्याचं आवाहन या कलाकारांनी केलंय.

“लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्याऐवजी ६०० कलाकार एका ठराविक पक्षाला मत न देण्याचं आवाहन करत आहेत. त्यामुळे आम्ही ९०० कलाकार सरकारच्या समर्थनार्थ मैदानात उतरलो आहोत”, असं अभिनेत्री पल्लवी जोशीने सांगितलं.
त्यासोबतच ती पुढे म्हणते, “कोणत्या पक्षाला मत द्यावं हा सर्वस्वी मतदात्यांचा निर्णय असतो. मात्र योग्य व्यक्तीला मतदान करण्याचा सकारात्मक संदेश देण्याचं काम आम्ही करत आहोत”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 12:23 pm

Web Title: modi is need of the hour say over 900 artistes
Next Stories
1 VIDEO: मतांचा जोगवा मागताना काँग्रेसच्या नेत्याचा नागीन डान्स
2 मतदारांना गुगलकडून मतदानाचे आवाहन, डुडलद्वारे दिला संदेश
3 ‘जिए ओ बिहार के लाला!’; कन्हैया कुमारच्या प्रचारसभेतील स्वरा भास्करचे भाषण व्हायरल
Just Now!
X