भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी गुजरातमध्ये केवळ अदानी आणि अंबानींसाठी विकासपुरूष असल्याची टीका ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.  
गुजरामधील विकासकामांची ‘तपासणी’ करण्यासाठी केजरीवाल गुजरातमध्ये चार दिवसांच्या दौऱयावर आहेत. या दरम्यान, केजरीवालांनी अदानी बंदराजवळील मुंद्रा तालुक्यातील शेतकऱयांची भेट घेतली.
केजरीवाल म्हणतात की, “होय मोदी विकासपुरूष आहेत पण, केवळ अदानी आणि अंबांनीसाठीच. येथे फक्त मोठ्या कंपन्यांचे राज्य चालते सामान्य माणसाला येथे कुठेच जागा नाही.
‘आप’चे नेते आशुतोष आणि शाजिया इल्मींविरोधातही गुन्हा
मोठ्या कंपन्या आणि सरकारने एकत्रित येऊन येथील जमीनी ताब्यात घेण्याचा घाट घातला. यातून येथील सर्व कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर काळा पैसा कमावून परदेशातील बँकांमध्ये जमा करून ठेवला.” असा आरोपही केजरीवालांनी यावेळी केला आहे.
गुजरात पोलिसांची माझ्यावर पाळत- मनीष सिसोदिया
ते केवळ विकासाचे प्रचारतंत्र वापरत आहेत परंतु, यामागे दडलेले सत्य दाखविण्यास ते विसरले आहेत. इथल्या नागरिकांना होणारा त्रास त्यांनी लक्षात घेतला नसल्याची केजरीवालांनी मोदींवर नाव न घेता अप्रत्यक्षरित्या टीका केली.