29 May 2020

News Flash

मोदींनी खोटे बोलणे आता थांबवावे! राहुल गांधी यांचा जोरदार हल्ला

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढविला.

भाजप सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष झाले आहे. आता तरी मोदींनी आणि त्यांच्या इतर नेत्यांनी प्रचाराच्या मनःस्थितीतून बाहेर पडून काम करण्यास सुरुवात केली पाहिजे.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढविला. मोदी यांनी खोटे बोलणे थांबवावे आणि राज्यातून बेरोजगार युवक स्थलांतर करीत असल्याचे खापर जद (यू) आणि राजदवर फोडणे थांबवावे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
मोदी येतात आणि मोठी भाषणे करतात; परंतु महाराष्ट्रातील भाजप सरकारकडून बिहारी जनतेला कशी वागणूक मिळते त्याबद्दल त्यांना विचारा. महाराष्ट्रातून बिहारींना हाकलून देण्यात आले तेव्हा त्यांनी काय केले, असे राहुल गांधी म्हणाले. रोजगाराच्या शोधात बिहारमधील युवक स्थलांतर करीत आहेत, त्या प्रश्नावरून मोदी यांनी अलीकडेच आपल्या भाषणांत तोफ डागली होती. बिहारमधील युवकांना राज्य सोडून जाणे कोणी भाग पाडले, असा सवाल मोदी यांनी नितीशकुमार आणि लालूप्रसाद यांना केला, त्याचा संदर्भ देऊन राहुल गांधी बोलत होते. मोदी हे खोटे बोलत असल्याचे बिहारमधील जनतेलाच नव्हे, तर देशाला कळले आहे. त्यामुळे आता खोटे बोलणे थांबवून मोदी यांनी आपले काम करावे. संघ परिवाराने आपल्याला (मोदींना) प्रशिक्षण दिल्याचे आपल्याला माहीत आहे, असेही गांधी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2015 4:45 am

Web Title: modi lie stop now rahul gandhi
टॅग Rahul Gandhi
Next Stories
1 अभाविपची सारवासारव! दादरीप्रकरणी चुकीचे वृत्त
2 छोटा राजनला अटक , कुख्यात गुन्हेगार आणि दाऊदचा वैरी
3 पाक, अफगाणिस्तानला हादरा
Just Now!
X