करोना विषाणू प्रतिबंधक परिणामकारक अशा औषधाचा शोध लागेपर्यंत गाफील राहू नये, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोकांना दिला आणि आपला मुद्दा पटवून देण्यासाठी ‘जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं’, असा नारा दिला.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मध्य प्रदेशच्या ग्रामीण भागांत बांधल्या गेलेल्या १.७५ लाख घरांच्या आभासी गृहप्रवेश समारंभात भाषण करताना मोदी यांनी हा नारा दिला.

‘‘जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं. दो गज की दूरी, मास्क है ज़रुरी,’’ असे मोदी म्हणाले. मध्य प्रदेशात शुक्रवारी रात्रीपर्यंत ८३६१९ लोकांना करोनाचा संसर्ग झाला असून १६९१ लोक मृत्युमुखी पडले आहेत.