01 March 2021

News Flash

‘मोदी रोजगार दो’ Top Trend! ‘मोदीजी, भाषणं नको रोजगार द्या’, म्हणणारे ६ लाख ७४ हजारांहून Tweets

२०२० मध्ये एक कोटी ७७ लाख पगारदार व्यक्तींनी आपला रोजगार गमावला

(मूळ फोटो: एएफपीवरुन साभार)

देशामधील बेरोजगारी दिवसोंदिवस वाढत असून याच समस्येला कंटाळलेल्या अनेकांनी आता थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींकडेच नोकऱ्या देण्याची मागणी केलीय. ‘मोदी रोजगार दो’ हा हॅशटॅग रविवारपासून सोशल नेटवर्किंगवर ट्रेण्ड होताना दिसत आहे. या हॅशटॅगवर सहा लाख ७४ हजारांहून अधिक जणांनी ट्विट केलं आहे. अनेकांनी भाजपाने सत्तेत येताना दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलेलं त्याचं काय झालं असा प्रश्न विचारला आहे. राजकीय विषयांमध्ये मोदी रोजगार दो हा हॅशटॅग भारतात टॉप ट्रेण्डींग विषय आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही ट्विटरवरुन हा हॅशटॅग वपारुन केंद्र सरकारला, ‘सुनो जन के मन की बात’ असा सल्ला दिलाय.

करोनाच्या कालावधीमध्ये देशात बेरोजगारांची संख्या झापट्याने वाढली. आयएलओच्या आखडेवारीनुसार जागतिक स्तरावर बेरोजगारी ५७ टक्क्यांपर्यंत आहेत. तर भारतामध्ये बेरोजगारी ही ४७ टक्क्यांपर्यंत आहे. भारताचे शेजारी देश असणाऱ्या पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर आहे. पाकिस्तानमध्ये ५० टक्के तर श्रीलंकेमध्ये ५१ टक्के बेरोजगारी असून बांगलादेशमध्ये बेरोजगारीचे प्रमाण ५७ टक्क्यांपर्यंत आहे.

करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये लाखो लोकांनी रोजगार गमावला होता. सीएमआयईईच्या अहवालानुसार २०२० मध्ये एक कोटी ७७ लाख पगारदार व्यक्तींनी आपला रोजगार गमावला. खास करुन मार्चमध्ये लॉकडाउन लागू झाल्यानंतर जून आणि जुलैपर्यंत अनेकांनी आपला रोजगार गमावला. त्यामुळेच आता अर्थव्यवस्था हळूहळू सुरळीत होत असतानाच सरकारने दिलेलं आश्वासन पाळत बेरोजगारांना नोकरी द्यावी अशी मागणी ट्विटवरुन केली जात आहे.

१) कठीण प्रश्न आहे

२)नव्या विद्यार्थ्यांना संधी द्या

३) जन की बात

४) भाषण नको.. नोकरी द्या

५) ले मोदीजी…

बेरोजगारी हे जागतिक स्तरावरील संकट असून जागतिक अर्थव्यवस्थेसमोर सध्या रोजगार उपलब्ध करुन देणे हा मोठा प्रश्न आहे. अमेरिकेतील बेरोजगारीने सर्व विक्रम मोडित काढलेत. अमेरिकेमध्ये नोकऱ्यांची नव्या संधीच उपलब्ध नाहीयत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 3:21 pm

Web Title: modi rojgar do is number one political trend on twitter india scsg 91
Next Stories
1 …त्या ६५ हजार कोटींवर देशातील शेतकऱ्यांचा हक्क आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
2 राहुल गांधीच्या पायगुणामुळे पुद्दुचेरीमधील काँग्रेस सरकार पडलं; भाजपा नेत्याचा टोला
3 चीनचा थयथयाट! गलवान संघर्षाबद्दल प्रश्न विचारणाऱ्या तीन पत्रकारांवर कारवाई
Just Now!
X