08 December 2019

News Flash

तिन्ही दलातील समन्वयासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ -पंतप्रधानांची महत्वाची घोषणा

७० वर्षात जे काम झाले नाही ते १० दिवसात केले.

७३ वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली. देशाच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी सरकार ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ नेमणार आहे. या पदावरील व्यक्ती तिन्ही दलांचे नेतृत्व करेल, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादावर भाष्य केले. दहशतवाद पोसणाऱ्यांचा भारताकडून पर्दाफाश होत आहे. आज केवळ भारतच नाही तर श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशांनाही दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. आम्ही दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात लढत आहोत. कलम ३७० बद्दल बोलताना मोदी म्हणाले, अनेकांनी कलम ३७० रद्द करण्यासाठी पाठिंबा दिला. परंतु काही लोक राजकारण करण्यासाठी याला विरोध करत आहेत. कलम ३७०, कलम ३५ ए रद्द केल्याने जर राज्याच भाग्य बदलणार होते, तर गेल्या अनेक वर्षांपासून बहुमत असून ते ताटकळत का ठेवलं. माझ्यासाठी देशाचं हितच सर्वकाही आहे. त्यामुळे ७० वर्षात जे काम झाले नाही ते १० दिवसात केले. संरक्षणाच्या मुद्यावरही त्यांनी यावेळी भर दिला. तिन्ही संरक्षण दले देशाचा अभिमान आहे. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिने तिन्ही दलांमध्ये समन्वयाची गरज आहे. त्यासाठी एका महत्वाच्या निर्णयाची घोषणा आज करत आहे. ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ यांची नियुक्ती सरकार करणार आहे. त्यामुळे संरक्षण दले अधिक सक्षम होतील, असे पंतप्रधानांनी सांगितले.

आम्ही महागाई नियंत्रणात आणली, तसेच विकासदरदेखील कायम ठेवला आहे. संपत्ती निर्मिती देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संपत्ती निर्मिती करणारेदेखील या देशाची संपत्ती आहेत. सरकारी कामे लवकरात लवकर व्हावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लोकांच्या अपेक्षा वर्षानुवर्ष वाढत राहणार आहेत आणि त्यादेखील पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. व्यवसाय सुलभीकरणाचेही प्रयत्न आम्ही करत आहोत. साथीदार म्हणून सरकारच्या पाठीशी राहिले पाहिजे. ‘ना सरकार का दबाव हो ना सरकार का अभाव हो’ अशा पद्धतीने काम होत असल्याचे मोदी म्हणाले.

First Published on August 15, 2019 9:36 am

Web Title: modi says govt will appointed chief of defence staff for coordination between our forces bmh 90
Just Now!
X