News Flash

गुजरातमधील लोकसभेच्या २६ पैकी २६ जागा जिंकण्याचे मोदींचे लक्ष्य

गुजरातमधील विरोधी पक्षाला म्हणजेच कॉंग्रेसला राज्यातील लोकसभेच्या एकाही जागेवर विजय मिळू नये, यासाठी नियोजनास सुरुवात झाली आहे.

| October 28, 2013 11:24 am

गुजरातमध्ये सलग तीन वेळा सत्ता मिळवण्यात यशस्वी ठरलेले भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीत याच राज्यातून सर्व २६ जागा निवडून आणण्यासाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली. गुजरातमधील विरोधी पक्षाला म्हणजेच कॉंग्रेसला राज्यातील लोकसभेच्या एकाही जागेवर विजय मिळू नये, यासाठी नियोजनास सुरुवात झाली आहे.
२००९ आणि २००४ लोकसभा निवडणुकीत भाजपला गुजरातमध्ये चमकदार यश मिळाले नव्हते. २००९ मध्ये पक्षाला १५ जागांवर तर २००४ मध्ये १४ जागांवर समाधान मानावे लागले होते. याच दोन्ही वर्षांत कॉंग्रेसला लोकसभा निवडणुकीत अनुक्रमे ११ आणि १२ जागा मिळाल्या होत्या. केशुभाई पटेल हे १९९८ मध्ये भाजपचे मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले होते. २६ पैकी २० जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. केशुभाई पटेल यांचे हे रेकॉर्ड कोणत्याही स्थितीत तोडले गेलेच पाहिजे, असेच लक्ष्य मोदी यांनी राज्यातील पक्षाच्या नेत्यांपुढे ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीला अजून वेळ असला, तरी आतापासूनच भाजपची स्थिती गुजरातमध्ये अजून चांगली कशी करता येईल, यादृष्टीने विचार करण्यास सुरुवात झाली आहे.
नरेंद्र मोदी हेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्यामुळे लाखो गुजराती लोक भाजपलाच मतदान करतील, असा भाजपच्या नेत्यांचा होरा आहे. भाजपने राज्यातील लोकसभेच्या मतदारसंघाचे सर्वेक्षण केले असून, उमेदवारांच्या नावाखेरिज इतर सर्व तयारी पूर्ण केली आहे, असे पक्षाचे राज्यातील प्रवक्ते हर्षद पटेल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 11:24 am

Web Title: modi seeking to better keshubhais record in guj in ls polls
Next Stories
1 ‘नरेंद्र मोदी उद्धव आणि सुखबीर सिंह यांना ‘शहजादे’ म्हणतील का?’
2 पाटण्यातील साखळी बॉम्बस्फोटांमागे इंडियन मुजाहिदीन?
3 ‘राजकारणात प्रवेशाचा प्रश्नच उद्भवत नाही’
Just Now!
X