संसदेवर १३ डिसेंबर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रमुख नेत्यांनी  आज आदरांजली वाहिली. संसदेवरील हल्ल्याला आज १४ वर्षे झाली आहेत. मोदींसह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह प्रमुख नेत्यांनी जवानांना आदरांजली वाहिली.
२००१ मध्ये संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. संसदेच्या आवारात पाच शस्त्रास्त्रधारी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये सहा जवानांसह नऊ जणांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोर पाच दहशतवाद्यांनाही ठार मारण्यात आले होते.