News Flash

चीनचा दुटप्पीपणा! एकीकडे मैत्रीचा हात, दुसरीकडे चिनी सैन्याची भारतात घुसखोरी

चीनच्या राजदूतानी सोमवारी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील पुढील बैठकीची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग. (संग्रहित)

चीनच्या राजदूतानी सोमवारी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील पुढील बैठकीची घोषणा केली. त्याचवेळी चिनी सैन्याने पुन्हा एकदा भारताच्या हद्दीत अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात पुढच्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये अर्जेंटिनामध्ये बैठक होणार आहे.

चीनचे राजदूत लुओ च्यहुई यांनी सोमवारी ही माहिती दिली अफगाणिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांसाठी भारत आणि चीनने प्रथमच संयुक्तपणे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. दिल्लीत या कार्यक्रमाच्या उदघाटनाच्याप्रसंगी बोलताना च्युहई यांनी ही माहिती दिली. चीनचे परराष्ट्रमंत्री सुद्धा डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत.

आजपासून दिल्लीमध्ये अफगाणिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरु होणार आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात चीनच्या वुहान शहरात पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यामध्ये एका अनौपचारिक बैठक पार पडली होती. त्यामध्ये ठरल्यानुसार भारत-चीनने पुढाकार घेऊन अफगाणी अधिकाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण सत्र आयोजित केले आहे. १५ ते २६ ऑक्टोंबरपर्यंत हा प्रशिक्षण कार्यक्रम चालणार आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 3:08 pm

Web Title: modi xi will meet in argentina
Next Stories
1 चीनची पुन्हा घुसखोरी, भारतीय जवानांच्या विरोधानंतर परतले चिनी सैनिक
2 फ्लॅटमध्ये आढळला पत्रकार महिलेचा मृतदेह
3 VIDEO: एनकाउंटर करताना रिव्हॉल्वर जाम; पोलिसांनी काढला गोळीबाराचा आवाज
Just Now!
X