News Flash

कुणाल कामरा म्हणतो, “मोदीजी मला विमानामध्ये भेटू नका, नाहीतर…”

अर्णब गोस्वामी प्रकरणानंतर कामराची थेट मोदींकडे मागणी

कुणाल कामरा आणि नरेंद्र मोदी

कॉमेडियन कुणाल कामरावर इंडिगो एअरलाइन्स विमानात गैरवर्तवणूक केल्याबद्दल सहा महिन्यांची बंदी घातली आहे. इंडिगोबरोबरच एअर इंडिया, स्पाइस जेट आणि गो एअर या विमान कंपन्यांनाही कुणालवर बंदी टाकली आहे. याच पार्श्वभूमीवर आता कुणालने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक विनंती केली आहे. “मोदीजी मला विमानामध्ये भेटू नका,” अशी विनंती कुणालने पंतप्रधानांकडे केली आहे.

पार्श्वभूमी काय?

कॉमेडियन कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामी २८ जानेवारी रोजी मुंबईहून लखनौला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E 5317 या विमानाने प्रवास करत होते. प्रवासदरम्यान कुणालने गोस्वामी यांच्या आसनाजवळ जात आपल्या शैलीत विविध प्रश्नांचा भडिमार करून त्यांना भंडावून सोडले. याबाबतची चित्रफीत कामरा याने ट्विटरवर टाकल्यानंतर समाजमाध्यमांत त्याचे पडसाद उमटले.

बंदी कोणकोणत्या कंपन्यांनी घातली?

या संपूर्ण घटनेचे पडसाद समाजमाध्यमांवर उमटल्यानंतर ‘इंडिगो’ने कामरा याच्यावर प्रवासबंदी घालण्याचा निर्णय घेतला. सहप्रवाशाशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत ‘इंडिगो’ने ही कारवाई केली. ‘इंडिगो’पाठोपाठ ‘स्पाईसजेट’, ‘एअर इंडिया’ आणि ‘गोएअर’ या विमान कंपन्यांनीही कामरावर प्रवासबंदीचा निर्णय घेतला. मात्र विस्तारा एअर लाइन्सने कुणालवर बंदी घातलेली नाही. त्यामुळेच काही दिवसापूर्वी कुणालने विस्ताराने प्रवास करत असल्याचा एक फोटोही ट्विट केला होता.

आता थेट मोदींवर निशाणा साधताना काय म्हणाला कुणाल?

सध्या सुरु असणाऱ्या या बंदीच्या गोंधळावरुन कुणालने थेट मोदींवर निशाणा साधला आहे. “मोदीजी तुम्ही अंबानींच्या विमानाने आणि अदानींच्या हॅलिकॉप्टरनेच फिरत जा. तुम्ही मला एखाद्या विमानात भेटलात आणि मी पुन्हा भावूक झालो तर आयुष्यभर मला आयआरसीटीसीच्या वेबसाईटबरोबर वाद घालावा लागेल,” असं ट्विट कुणालने केलं आहे. या ट्विटला ११ हजारहून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे.

कुणाल कामराची इंडिगोला कायदेशीर नोटीस

आपल्यावर बंदी घातल्याप्रकरणी इंडिगोला कुणालने नोटीस पाठवली आहे. कंपनीने बंदी घातल्याने झालेल्या मानसिक त्रासाच्या मोबदल्यात २५ लाखांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कुणालने केली आहे. कुणालने पाठवलेल्या नोटीसमध्ये, ‘कंपनीने आपल्यावरील बंदी तात्काळ उठवण्यात यावी’ अशी मागणी केली आहे. तसेच ‘कंपनीने सर्व वर्तमानपत्रे, इलेक्ट्रीक माध्यामे आणि कंपनीच्या सर्व सोशल नेटवर्किंग साईट्स अकाऊंटवरुन आपली बिनशर्थ माफी मागावी,’ अशी मागणीही कुणालने केली आहे. ‘कंपनीने केलेल्या कारवाईमुळे मला मानसिक त्रास झाला आहे. त्यामुळे माझ्यावर तडकाफडकी बंदी घालण्याचा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी,’ असं कुणालने म्हटलं आहे. सध्या कुणाल परदेशात गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 12:50 pm

Web Title: modiji please dont meet me in plane kunal kamras request to pm scsg 91
Next Stories
1 बाबांनी मला आणि माझ्या भावाला भगवद गीता शिकवली, हा दहशतवाद आहे? हर्षिता केजरीवालचा सवाल
2 राम मंदिराच्या निर्मितीसाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ट्रस्टची स्थापना
3 ‘या’ मुस्लीमबहुल देशात सुरू झाले पहिले हिंदू विश्वविद्यापीठ
Just Now!
X