10 August 2020

News Flash

मोदींचे हात रक्ताने माखलेले -मुलायमसिंह

उत्तर प्रदेशचे गुजरात करू या नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याची समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी खिल्ली उडवली आहे.

| January 24, 2014 12:05 pm

उत्तर प्रदेशचे गुजरात करू या नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याची समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी खिल्ली उडवली आहे. मोदींचे हात निरपराधांच्या रक्ताने माखलेले आहेत अशा शब्दात टीकेला उत्तर दिले  आहे.
ज्या व्यक्तीच्या राज्यात असे अत्याचार झाले आहेत, त्याला पंतप्रधानपदाचा उमेदवार कसा करणार असा सवाल येथील जाहीर सभेत बोलताना मुलायमसिंहांनी केला. गोरखपूर येथील सभेत बोलताना मोदींनी उत्तर प्रदेशचा गुजरात करू असे आवाहन केले होते. त्याला मुलायमसिंहांनी उत्तर देत चौफेर टीका केली. गुजरातमधील जातीय दंग्यांना मोदी जबाबदार असल्याचा आरोपही केला. उत्तर प्रदेश सरकारच्या कामाची तुलना गुजरातशी करावी असे आवाहन करतानाच समाजवादी पक्षाने मोठय़ा प्रमाणात विकासकामे केल्याचा दावा केला.
समाजवादी पक्षाच्या मदतीशिवाय लोकसभा निवडणुकीनंतर एकाही पक्षाला सरकार स्थापन करता येणार नाही असा दावा मुलायमसिंहांनी केला. मोदींबरोबरच केंद्रातील काँग्रेस सरकारवरही त्यांनी टीका केली. घोटाळे आणि महागाई यामुळे अर्थव्यवस्था बिकट झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2014 12:05 pm

Web Title: modis hands soaked in blood mulayam
Next Stories
1 सीरियातील बंडखोर गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न
2 सीरियातील दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या दोन ब्रिटिश महिलांना अटक
3 महिला आयोगापुढे बाजू मांडणे सोमनाथ भारतींनी टाळले
Just Now!
X