भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यांना बलात्कारप्रकरणी केलेल्या विधानावरून टीका केली. तसेच यावेळी मोदींनी मुझफ्फरनगर दंगली मुद्द्यावरून त्यांचावर तोंडसुख घेतले. मुलायमसिंह यांच्याबाबत एक अडचण आहे, ती म्हणजे नको त्या ठिकाणी ते कठोर भूमिका घेतात, आणि ज्या ठिकाणी कठोर भूमिका घेण्याची गरज असते तिथे त्यांच्याकडून मवाळ भूमिका घेतली जाते अशा शब्दांत मोदींनी मुलायमसिंह यांच्यावर टीका केली. समाजातील स्त्रियांवर अत्याचार होतात, मुझफ्फरनगर दंगलीतील पिडीतांचे भुकेमुळे बळी जात आहेत, तरीसुद्धा समाजवादी पक्षाकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. मुझफ्फरनगर दंगलीतील पिडीतांना न्याय देण्यासाठी मुलायमसिंह यादव कणखर भूमिका घेण्यात कमी पडल्याचे नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत सांगितले.