08 March 2021

News Flash

‘पाकिस्तानातील मोहाजिरांची स्थिती बिकट, त्यांना देशद्रोही ठरवून हत्या केल्या जाताहेत’

पाकिस्तानी नेत्याने मांडली व्यथा

पाकिस्तानी नेते अल्ताफ हुसेन

पाकिस्तानात राहणाऱ्या मोहाजिर लोकांना देशद्रोही ठरवण्यात आले आहे, तसेच त्यांना देशातून हाकलून लावण्याचे आणि पाकिस्तानी सैन्याकडून ठार मारण्याचे प्रकारही घडल्याचा, दावा पाकिस्तानातील एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाने केला आहे. अल्ताफ हुसेन असे या नेत्याचे नाव असून तो पाकिस्तानातील मुत्ताहिदा कामी मुव्हमेंट (एमक्युएम) पक्षाचा प्रमुख आहे. फाळणीच्यावेळी सध्याच्या भारतातील ज्या उर्दू भाषिक लोकांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह पाकिस्तानात आश्रय घेतला होता, त्यांना पाकिस्तानात मोहाजिर म्हणून संबोधले जाते. प्रामुख्याने सिंध प्रांतात हे लोक मोठ्या प्रमाणावर राहतात.

लंडनमध्ये असलेल्या अल्ताफ हुसेन यांनी एका व्हिडियो संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. ते म्हणतात की, पाकिस्तानकडून या मोहाजिरांच्या मानवी हक्कांचे दररोज उल्लंघन केले जात आहे. त्याचबरोबर सिंधी, कव्वाली, पश्तून्स आणि बलुच या इतर समाजातील लोकांवरही पाकिस्तानात अनेक अन्याय अत्याचार झाले आहेत. पाकिस्तानी सैन्याने न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन अनेकांना ठारही केले आहे. पाकिस्तानात या लोकांना नागरिकत्वाचे हक्क प्रदान करण्याऐवजी त्यांना बंदुकांच्या धाकाने अत्याचार करण्यात आले आहेत. यातील अनेक नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत. अल्पसंख्यांकांच्या मानव हक्कांचे येथे उघड उघड उल्लंघन केले जाते.

पाकिस्तानात पंजाबी वंशाच्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यांना पाकिस्तानात सर्व प्रकारचे फायदे मिळतात. त्यांनी येथे मोठ्या प्रमाणावर जमिनी देखील घेऊन ठेवल्या आहेत. पाकिस्तानी लष्कर आणि न्यायव्यवस्था त्यांना पुरेपूर मदतही करते. त्यामुळे पंजाबी लोक येथे विविध सरकारी पदांवर कार्यरत आहेत. त्यांचे वर्चस्व मोहाजिर आणि इतर अल्पसंख्यांकांना पूर्णपणे दुर्लक्षित करते. आम्हाला येथे गुलामाप्रमाणे वागणूक दिली जाते, अशी खंत हुसेन यांनी व्यक्त केली आहे. मोहाजिरांनी पाकिस्तानात आपल्या सोयीसाठी काही पायाभूत सुविधा उभारल्या मात्र, त्यावर इथल्या पंजाबी लोकांनी कब्जा केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

बलुचिस्तान तर पाकिस्तानी लष्कराचा अड्डा बनल्याचे हुसेन यांनी म्हटले आहे. विद्रोह्यांना दूर करण्याच्या नावाखाली सैन्याने येथे जुलूम जबरदस्तीने नियंत्रणाखाली ठेवले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनंतर अजूनही येथील मोहाजिर लोक गरीब राहिले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 5:43 pm

Web Title: mohajirs of pakistan are facing a tough situation they are killing being targeted by anti nationalists
Next Stories
1 FB Live बुलेटीन: इरफान खानला दुर्धर आजार, मोहम्मद शमीची कबुली व अन्य बातम्या
2 नोकरी करुन राजपूत शान मोडते म्हणून सासऱ्याने तलवारीने सुनेचं मुंडक उडवलं
3 ६.५ सेंटीमीटरच्या स्क्रूमुळे झाली हत्येची उकल
Just Now!
X