पत्नीने केलेल्या आरोपांमुळे सध्या चर्चेत असलेला भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या गाडीचा अपघात झाला आहे. देहराडून येथून दिल्लीला येताना हा अपघात झाला. यामध्ये शमी जखमी झाला असून त्याच्या डोक्याला १० टाके पडले आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट अकादमीच्या कामासाठी मोहम्मद शमी देहराडूनमध्ये होता. तेथून आज पहाटे तो दिल्लीला परतत असताना रस्त्यात एका भरधाव ट्रकने शमीच्या कारला धडक दिली. या अपघातात शमीच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्याला दहा टाके पडले आहेत. सध्या शमीची प्रकृती स्थिर असून तो डेहराडूनमध्ये विश्रांती घेत आहे.