News Flash

मनी लाँडरिंग : रॉबर्ट वढेरांना गुंतवणुकीसाठी मदत करणाऱ्या उद्योजकाला अटक

ईडीकडून कारवाई

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्यावर गुन्हा दाखल असलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीकडून आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. वढेरा यांचे सहकारी असलेल्या एका अनिवासी भारतीय उद्योजकाला ईडीने अटक केली आहे. सी.सी. थंपी असं या उद्योजकाचं नाव असून, थंपी यांनी लंडनमधील गृहनिर्माण क्षेत्रात गुंतवणूक करण्यास वढेरा यांना मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

रॉबर्ट वढेरा यांच्याविरूद्ध आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात ईडीने सी.सी. थंपी यांना अटक केली आहे. थंपी हे अनिवासी भारतीय उद्योजक असून, ते वढेरांचे जवळचे सहकारी आहे. त्यांनी वढेरा यांना लंडनमधील गृहनिर्माण क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास मदत केली, असा आरोप आहे. थंपी यांची स्कायलाईट एझेडई नावाची दुबईत कंपनी आहे. या कंपनीचे वढेरांच्या नावे भारतात असलेल्या कंपनीत शेअर आहेत.

अनेक देशातून करण्यात आलेल्या बँकिंग व्यवहाराच्या पावत्यांमुळे ईडीच्या तपासाला दिशा मिळाली आणि ती थंपी यांच्या अटकेपर्यंत पोहोचली. वढेरा आणि भंडारी यांच्यासोबत जमीन व्यवहार आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा पुरावा असल्याचा दावा ईडीनं केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 9:52 am

Web Title: money laundering ed arrests robert vadra aide bmh 90
Next Stories
1 सुरतच्या रघुवीर मार्केटमध्ये भीषण आग; अग्निशमनच्या ४० गाड्या घटनास्थळी
2 तीन राजधानी असलेलं आंध्र प्रदेश देशातील एकमेव राज्य
3 एक जूनपासून ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेला सुरूवात
Just Now!
X