विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी द्रमुक व अद्रमुककडून एका मतामागे एक लाख रूपये घ्या, असा आग्रह करून मतदारांना चिथावणी देणाऱ्या डीएमडीकेच्या महिला आघाडी नेत्या तसेच पक्षाचे संस्थापक विजयकांत यांच्या पत्नी प्रेमलता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेमलता यांनी अलिकडेच एका जाहीर सभेत असे सांगितले की, लोकांनी अद्रमुक व द्रमुककडून पैसे घेण्यास हरकत नाही. त्यामुळे अद्रमुकच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व कायदा व भादंवि नुसार कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीत केली होती. निवडणूक अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार पोलिसांनी प्रेमलता यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, प्रेमलता यांनी काही राजकीय पक्ष मताला २ ते ३ हजार रूपये देतात पण तुम्ही त्यांच्याकडे एका मताला एक लाख रूपये मागा असा सल्ला जाहीर सभेत दिला होता. १६ मे रोजी तामिळनाडूत विधानसभा निवडणुका होत आहे.