अणू ऊर्जा हा राजकीयदृष्टय़ा संवेदनशील मुद्दा आहे. त्यामुळे अणू ऊर्जेसाठी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणार नसल्याचे जागतिक बँक आणि संयुक्त राष्ट्रांनी गुरुवारी स्पष्ट केले.सन २०३० पर्यंत सर्वाना वीज मिळेल यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. मात्र अणू ऊर्जा तयार करणार नसल्याचे जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम याँग किम आणि संयुक्त राष्ट्रांचे नेते बान कि मून यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.अणू ऊर्जा हा सध्याचा अतिशय संवेदनशील राजकीय मुद्दा आहे. प्रत्येक देशाची भूमिका याबाबत वेगवेगळी आहे. त्यामुळे जागतिक बँक समूह अणू ऊर्जेसाठी साहाय्य करणार नाही. तसेच या पाश्र्वभूमीवर जागतिक ऊर्जेची समस्या सोडविण्यासाठी जलविद्युत प्रकल्प, सौर ऊर्जा तसेच पवन ऊर्जेचा पर्यायांवर आपण काम करीत असल्याचे किम यांनी स्पष्ट केले. २०३० पर्यंत जगभरातील ऊर्जेचे गरज भागवण्यासाठी वर्षांकाठी ६०० ते ८००अब्ज डॉलरची गरज असल्याचे किम यांनी स्पष्ट केले. काही देशांमधील केवळ १० टक्के लोकसंख्येलाच विजेचा पुरवठा होतो. त्यामुळे यापुढे नवीन ऊर्जा स्रोतांसाठीच पैसे उभारले जातील.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2013 12:11 pm