अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांची पत्नी हिलरी क्लिंटन यांच्या २००८ मधील अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळी आपण भीतीच्या छायेत होतो. आपल्याला राजकीय बळीचा बकरा बनवले जाण्याची शक्यता होती. आता पुन्हा २०१६ मध्ये हिलरी िक्लटन अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याने भीती कायम आहे, पण एकांतवासातून व भीतीच्या भावनेतून आता आपण बाहेर पडण्याचा निश्चय केला आहे , अशा भावना अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांची प्रेयसी मोनिका लेवेन्स्की हिने ‘व्हॅनिटी फेअर’ नियतकालिकातील लेखात व्यक्त केल्या आहेत.
लेवेन्सकी या सध्या भयव्याकुळ अशा मनोवस्थेत असून त्यांनी व्हॅनिटी फेअरच्या अंकात लिहिले आहे की, आता आपण भूतकाळात अडकून राहणार नाही, त्या अभद्र छायांमधून आता आपण बाहेर पडणार आहोत. गेली आठ ते दहा वष्रे आपण एकांतवासात काढली, आता ते शक्य नाही. संरक्षक िभतीतून, भीतीच्या छायेतून आपण बाहेर पडणार असून भूतकाळ विसरणार आहोत. इतर लोकांच्या भवितव्याची काळजी करीत बसणार नाही, त्याची किंमत काय मोजावी लागेल हे आपण शोधूच.