News Flash

मेंदूरोगातील व्यक्तींना माकडे टंकलेखनाची मदत करणार

माकडे माणसाच्या मनात काय आहे हे वेगळ्या तंत्राने जाणून घेऊ शकतात

| October 1, 2016 01:35 am

दुसऱ्याचे मन जाणणाऱ्याला मनकवडा म्हणतात, आता माकडे माणसाच्या मनात काय आहे हे वेगळ्या तंत्राने जाणून घेऊ शकतात व माणसाच्या मेंदूने पाठवलेले संदेश वाचून इंग्रजी परिच्छेद टाईप करू शकतात. अतिशय प्रगत असे हे तंत्र असून पक्षाघात किंवा अपंग माणसांचे वाटाडे बनण्याचे काम माकडे करू शकतील. या तंत्रातली आधीची प्रारूपे तपासण्यात आली असून त्यात पक्षाघात असलेल्या व्यक्तींच्या मेंदूतील संदेश ओळखून माकडे टायपिंग करू शकतात पण ते टायपिंग कमी गतीने व तितके अचूक नव्हते.

स्टॅनफर्ड विद्यापीठाचे विद्यार्थी पॉल नुयुजुकियान यांनी सांगितले की, इंटरफेसचा वापर यात केला आहे. त्यात नवीन प्रारूपामध्ये टायपिंगचा वेग वाढवला आहे व अर्थपूर्ण संवादही शक्य आहे. स्टॅनफर्डचे वैज्ञानिक कृष्णा शेणॉय यांच्यासह काही संशोधकांनी लोकांचे मेंदू संदेश पकडून त्यांच्या मदतीने संगणकाचा कर्सर बिंदू पकडला व त्यामुळे माकडे मिनिटाला बारा शब्द टाइप म्हणजे टंकलिखित करू शकली. ज्या लोकांना हालचाली करता येत नाहीत त्यांना माकडे मदत करू शकतील. वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांना असाच स्नायूचा त्रास आहे त्यामुळे त्यांना बोलता येत नाही. ते सॉफ्टवेअरने संवाद साधतात पण त्याला मर्यादा आहेत. हॉकिंग हे आय ट्रॅकिंग सॉफ्टवेअर वापरू शकत नाहीत.

मेंदूचे संदेश थेट वाचणे हे मोठे आव्हान आहे त्यामुळे विचार व भावनांच्या मदतीने संवाद साधता येतो. यात अनेक इलेक्ट्रोड मेंदूत बसवून संदेश वाचले जातात व त्यानंतर संगणकाच्या माऊसला ते दिले जातात. यात संदेशांचे रूपांतरण व अक्षरांची निवड महत्त्वाची ठरते त्यात सुधारणा झाली आहे. सुधारित तंत्रज्ञानात माकडांचा टायपिंग वेग व अचूकतेत सुधारणा आहे. यात प्रगत अलगॉरिथमचा वापर केला जातो. माकडांना पडद्यावर अक्षरे बघून ती टाईप करण्याचा सराव दिलेला असतो. जे लोक टाइप करू शकत नाहीत, बोलूच शकत नाहीत त्यांच्यासाठी माकडांनी मिनिटाला बारा शब्द टाइप करणे ही मोठी गोष्ट आहे. आयईईई या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2016 1:34 am

Web Title: monkeys will help to brain disease person
Next Stories
1 यूएस ओपन : निवडणुका – एक शास्त्रशुद्ध खेळ
2 धुळ्याच्या जवानाच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न
3 भारताचा पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ला काळजीपूर्वक व प्रमाणबद्ध
Just Now!
X