भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर उद्या (३१ मे) मान्सून धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आज याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, केरळ किनारपट्टीच्या दक्षिणेकडील भागावर उद्या पावसाळा सुरू होण्यास अनुकूल वातावरण निर्माण होईल, असे हवामान विभागाने आपल्या ताज्या अंदाजात म्हटले आहे.

अरबी समुद्रातून राज्याच्या दिशेने येत असलेल्या बाष्पामुळे राज्याच्या बहुतांश भागात आठवडाभर हलक्या स्वरूपाच्या पूर्वमोसमी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरातून सध्या वेगाने प्रगती करीत असलेले नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मेपर्यंत केरळमध्ये पोहोचण्यास सध्या अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाकडून या अगोदर स्पष्ट करण्यात आले होते. ‘यास’ चक्रीवादळाने मोसमी वाऱ्यांचे प्रवाह मोकळे केले आणि त्यांना चालना दिल्याचेही सांगण्यात आले आहे.

pavana river become most polluted river in india
पवना नदी देशातील सर्वाधिक प्रदूषित; ‘हे’ आहे कारण
farmers deprived of help during congress government says pm narendra modi
काँग्रेसकाळात शेतकरी मदतीपासून वंचित; शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधानांची टीका
rain in Vidarbha
सावधान! येत्या ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
new port at murbe marathi news, murbe new port marathi news, vadhavan port marathi news
विश्लेषण : कसे असेल मुरबे येथील नवीन बंदर? वाढवणजवळ दुसरे बंदर कशासाठी?

तसेच, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात १ जूनपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मोसमी पावसापर्यंत पूर्वमोसमी पाऊस कायम राहण्याची शक्यता

शनिवारी (२९ मे) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. कोकण आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस होता. राज्यात मोसमी पावसाचे आगमन होईपर्यंत काही भागांत पूर्वमोसमी पाऊस सुरूच राहणार असल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे.