28 September 2020

News Flash

५९ टक्के भारतीय म्हणतात चीनसोबत युद्ध केलं पाहिजे, ७२ टक्के जनतेला विजयाची खात्री

खोऱ्यात झालेल्या संघर्षावरुन भारतीयांच्या मनात चीनविरोधीत संताप

संग्रहित छायाचित्र

भारत आणि चीनमध्ये १५ जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावरुन भारतीयांच्या मनात चीनविरोधीत संताप आहे. या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. या मुद्द्यावरुन ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन २०२०’ (Mood of The Nation 2020) सर्वेक्षणाच्या माध्यमातून लोकांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी ५९ टक्के भारतीयांनी चीनविरोधात युद्ध केलं पाहिजे असं मत नोंदवलं.

सर्वेक्षणात सीमा वादावरुन भारताने चीनसोबत युद्ध करावं का ? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ५९ टक्के लोकांनी हो असं उत्तर दिलं असून ३४ टक्के लोक युद्ध करण्याविरोधात आहेत. सात टक्के लोकांनी यावर काही उत्तर देऊ शकत नाही असं म्हटलं.

लोकांना चीनसोबत युद्ध झाल्यास कोणाचा विजय होईल असं विचारण्यात आलं असता ७२ टक्के लोकांनी भारत चीनचा पराभव करेल असा विश्वास व्यक्त केला. नऊ टक्के लोकांनी मात्र चीनचा पराभव करणं कठीण असल्याचं सांगितलं. चीनवर भारताने विश्वास ठेवावा की नाही असं विचारलं गेलं असता नऊ टक्के लोकांना हो असं सांगितलं असून ८४ टक्के लोकांनी चीन विश्वास ठेवण्यायोग्य नसल्याचं म्हटलं. सात टक्के लोकांनी मत नोंदवण्यास नकार दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 9:02 pm

Web Title: mood of the nation 2020 on galwan valley india china war sgy 87
Next Stories
1 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य आहे का?; भारतीय म्हणतात…
2 मोदी सरकारने करोना स्थिती कशी हाताळली? २९ टक्के जनता म्हणते अगदी उत्तम; तर…
3 चीनचा प्रश्न हाताळण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले का? सर्वेक्षणात जनतेने दिलं हे उत्तर
Just Now!
X