‘तेहलका’ नियतकालिकाचे संपादक तरुण तेजपाल अधिक संकटात सापडले असून, उद्वाहकात (लिफ्ट) ‘त्या’ महिलेसह प्रवेश करताना ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये टिपले गेले आहे. तेजपाल यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या महिलेच्या दाव्याला या नव्या पुराव्यांमुळे बळकटीच मिळाली आहे.
ज्या उद्वाहकामध्ये आपले लैंगिक शोषण झाल्याचा महिलेने आरोप केला, त्या उद्वाहकाबाहेरील आवाराचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना उपलब्ध झाले आहे. या फूटेजमधील घटना ‘पीडित’ महिलेच्या आरोपांनाच पुष्टी देतात, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गोवा पोलिसांच्या तपास पथकातील एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.‘थिंकफेस्ट’ हा कार्यक्रम ज्या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता, त्या हॉटेलच्या ब्लॉक क्र. ७ मधील एका उद्वाहकाबाहेरील परिसराचे ७ नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध झाले आहे. त्या फूटेजवरून उद्वाहकात किती गंभीर गुन्हा घडला असेल याचा अंदाज येतो, असेही सदर अधिकाऱ्याने नमूद केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2013 12:13 pm