कैरो : लिबियाच्या किनाऱ्यावर एक बोट  फुटून कि मान शंभर शरणार्थी मरण पावल्याची माहिती डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेने म्हटले आहे. इतर स्थलांतरितांना लिबियात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

मानवी संघटना म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की, १ सप्टेंबरला ही बोट फुटली  असून यात वाचलेल्या लोकांमधील काहींना भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत. त्यांच्यात काही गर्भवती महिला व बालके आहेत. डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संघटनेने या जखमींना मदत सुरू केली आहे. लिबियाच्या किनाऱ्यावर सुदान, माली, नायजेरिया, कॅमेरून, घाना, लिबिया, अल्जिरिया, इजिप्त या देशांच्या स्थलांतरितांना घेऊन निघालेल्या रबरी बोटीतील  हवा गेली त्यामुळे ते बुडाले.

लिबियाच्या तटरक्षक दलाने २७६ लोकांना दोन बोटीतून बाहेर काढले आहे व त्यांना लिबियातील खोम्स शहरात आणले. आतापर्यंत केवळ दोन मृतदेह सापडले आहेत. लिबिया हा युरोपकडे जातानाचा एक थांबा झाला असून तेथील नागरिक युरोपीय देशांत पळून जात आहेत.