24 October 2020

News Flash

करचुकवेगिरीला चाप! ११ लाखांहून अधिक पॅनकार्ड निष्क्रिय

केंद्र सरकारची संसदेत माहिती

संग्रहित छायाचित्र.

एकापेक्षा अधिक पॅन कार्ड तयार करून करचुकवेगिरी करणाऱ्यांना चाप लावण्याच्या दिशेनं केंद्र सरकारनं ठोस पाऊल उचललं आहे. सरकारनं आतापर्यंत ११.४४ लाख पॅन कार्ड रद्द अथवा निष्क्रिय केले आहेत, अशी माहिती केंद्र सरकारनं संसदेत दिली. राज्यसभेत एका लेखी उत्तरात केंद्रीय अर्थराज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी ही माहिती दिली.

२७ जुलैपर्यंत ११ लाख ४४ हजार २११ पॅन कार्ड (कायम खाते क्रमांक) रद्द अथवा निष्क्रिय करण्यात आले आहेत. एका व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक पॅन कार्ड असल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ‘एक व्यक्ती एक पॅन’ असा नियम असून, २७ जुलैपर्यंत १५६६ बनावट पॅन कार्ड असल्याची माहिती उजेडात आली आहे, असेही गंगवार यांनी सांगितले.

३१ ऑगस्टपर्यंत आधारशी पॅनकार्ड संलग्न करण्याची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत आधार कार्ड पॅन कार्डशी जोडलं नाही तर पॅन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. तसंच करदात्यांची अडचण लक्षात घेऊन २०१६-१७ या वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयानंतर संबंधित विभागांनी जवळपास ९०० ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यात सुमारे ९०० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. तसंच ७९६१ कोटी रुपयांची अघोषित संपत्ती उजेडात आली आहे. नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७ पर्यंतची ही आकडेवारी आहे. याशिवाय ८२३९ ठिकाणांचा सर्व्हे करण्यात आला असून ६७४५ कोटींची अघोषित संपत्ती उजेडात आली आहे, अशी माहिती गंगवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. गैरव्यवहाराचा संशय असलेल्या जवळपास ४०० व्यक्तींची नावं अंमलबजावणी संचलनालय आणि सीबीआयला देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2017 9:47 am

Web Title: more than 11 44 lakh pan deleted deactivated multiple pan income tax department government
टॅग Income Tax
Next Stories
1 पाकिस्तानचे इम्रान खान चारित्र्यहीन, अश्लील मेसेज पाठवल्याचा महिला नेत्याचा आरोप
2 गोमूत्र म्हणजे दुर्धर रोगांवरील रामबाण औषध- मीनाक्षी लेखी
3 मुलीचे मूत्रप्राशन करायला सांगितल्यामुळे बलात्कार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या
Just Now!
X