29 October 2020

News Flash

UP : १५ मुलं आणि काही महिलांना ठेवलं ओलीस, गोळीबाराचाही आवाज

आरोपीने कोणतीही मागणी केलेली नाही असं पोलिसांनी सांगितलं

एका माथेफिरुने उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद या ठिकाणी १५ मुलं आणि काही मुलांना ओलीस ठेवलं आहे. एएनआयने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या माथेफिरुने १५ मुलं आणि काही महिलांना ओलीस करुन घरात ठेवलं आहे. या घरातून गोळीबाराचे आणि बॉम्बचेही आवाज आले आहेत अशीही माहिती समोर आली आहे. ANI ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

ओलीस ठेवण्यात आलेल्या मुलांना आणि महिलांना सोडवण्यासाठी एटीएसच्या कमांडोंनाही पाचारण करण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दीड तासाभरापासून गोळीबार सुरु आहे. आयजी रेंज मोहीत अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. आरोपीने आत्तापर्यंत कोणतीही मागणी केलेली नाही असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.

ज्या माथेफिरुने मुलांना आणि महिलांना घरात ओलीस ठेवलं आहे त्याच्या मुलीचा वाढदिवस होता. त्याने वाढदिवसाच्या निमित्ताने या सगळ्यांना आपल्या घरी बोलावलं होतं. मात्र नंतर त्याने देशी कट्टा आणि बॉम्ब यांच्या मदतीने या सगळ्यांना ओलीस ठेवलं आहे. पोलिसांवर या माणसाने तीन हातबॉम्ब फेकले. ज्यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत असंही एएनआयनं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 9:52 pm

Web Title: more than 15 children and a few women have been held hostage at a house by a man scj 81
Next Stories
1 पंतप्रधान मोदी ‘त्याला’ त्याच्या कपड्यांवरून ओळखा, ओवेसींचा टोला
2 दोन मित्रांमध्ये पैशांवरुन वाद, एकाने चावलं दुसऱ्याचं नाक
3 हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी पकडला
Just Now!
X