25 February 2021

News Flash

बिहारमध्ये ७ लाखांवर मतदारांकडून ‘नोटा’चा वापर

एकूण ७ लाख ६ हजार २५२, म्हणजे एकूण मतदारांपैकी १.७ टक्के लोकांनी ‘नोटा’चा पर्याय स्वीकारला.

(संग्रहित छायाचित्र)

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत सात लाखाहून अधिक लोकांनी ‘यापैकी कुणीही नाही’, म्हणजे ‘नोटा’ हा पर्याय स्वीकारल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण ७ लाख ६ हजार २५२, म्हणजे एकूण मतदारांपैकी १.७ टक्के लोकांनी ‘नोटा’चा पर्याय स्वीकारला.

बारा मतांनी विजय

बिहारमधील हिल्सा मतदारसंघात संयुक्त जनता दलाच्या उमेदवाराने केवळ १२ मतांनी विजय मिळवला आहे.  येथून जनता दलाचे कृष्णमुरारी शरण यांना ६१,८४८ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधातील राष्ट्रीय जनता दलाचे शक्ती सिंह यांना ६१,८३६ मते मिळाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 12:09 am

Web Title: more than 7 lakh voters in bihar prefer nota abn 97
Next Stories
1 डिजिटल माध्यमांवर केंद्राचा अंकुश
2 फटाकेबंदी : हस्तक्षेपास न्यायालयाचा नकार
3 Bihar Result: भाजपाकडून सेलिब्रेशन सुरु होताच नितीश कुमार यांनी सोडलं मौन; ट्विट करत म्हणाले…
Just Now!
X