05 June 2020

News Flash

लॉकडाउन वाढणार की, संपणार, ११ एप्रिलनंतर अंतिम फैसला

खरंतर करोना बाधितांची संख्या कमी करणे हा लॉकडाउन मागचा खरा उद्देश होता.

संग्रहित छायाचित्र

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या महिन्यात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला होता. लॉकडाउनचा हा शेवटचा आठवडा आहे. खरंतर करोना बाधितांची संख्या कमी करणे हा लॉकडाउन मागचा खरा उद्देश होता. पण महाराष्ट्रासह देशभरात करोना बाधितांची संख्या वाढली. त्यामुळे १४ एप्रिलला लॉकडाउन संपणार कि, वाढणार याबद्दल देशातील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधला व त्यांची मते, विचार जाणून घेतले. करोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाउनचा कालावधी वाढवला तरी दुसऱ्या बाजूला बसणारा आर्थिक फटकाही मोठा असणार आहे. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझादही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवरुन पंतप्रधानांसोबत झालेल्या या बैठकीत सहभागी झाले होते.

“८० टक्क्यापेक्षा जास्त राजकीय पक्षांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे. लोकांकडूनच लॉकडाउन वाढवण्याची मागणी होत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. पण सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि अन्य व्यक्तींशी चर्चा केल्यानंतरच लॉकडाउन संबंधी अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी माहिती गुलाम नबी आझाद यांनी दिली. पंतप्रधान ११ एप्रिलला सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. त्याचवेळी अंतिम निर्णय होऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 7:03 pm

Web Title: more than 80 political parties have suggested extension of lockdown gulam nabi azad dmp 82
टॅग Coronavirus
Next Stories
1 इंदूर : लॉकडाऊन बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलवर दगडांनी हल्ला, ६ अटकेत
2 हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन औषधाच्या साठयाबद्दल आरोग्य मंत्रालयाने दिली अत्यंत महत्वाची माहिती…
3 चालू वर्षात सरकारनं आयकर रद्द करावा; निलेश राणे यांची मागणी
Just Now!
X