देशात गेल्या २४ तासांत ४४ हजार ४८९ जणांना करोनाची लागण झाल्याने करोनाबाधितांची संख्या ९२.६६ लाखांवर पोहोचली आहे. तर करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ८६.७९ लाख इतकी झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी जाहीर करण्यात आले.

देशातील करोनाबाधितांची संख्या ९२ लाख ६६ हजार ७०५ वर पोहोचली असून गेल्या २४ तासांत करोनामुळे ५२४ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आतापर्यंत एक लाख ३५ हजार २२३ वर पोहोचली आहे. बुधवारपासून उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत ७५९८  इतकी वाढ झाली असून ही संख्या चार लाख ५२ हजार ३४४ वर पोहोचली आहे. एकूण करोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण ४.८८ टक्के इतके आहे.

करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ८६ लाख ७९ हजार १३८ इतकी झाली असून बरे होण्याचे राष्ट्रीय प्रमाण ९३.६६ टक्के इतके झाले आहे. तर करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण १.४६ टक्के इतके झाले आहे, असेही आरोग्य मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.