मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

1. एका युतीची ही पुढची गोष्ट- उद्धव ठाकरे</strong>

आमच्या युतीची ही पुढची गोष्ट आहे, आधी काय घडलं? पुढे काय घडेल हे सगळे प्रश्न विचारले जात आहेत. जे उपस्थित होण्याची गरज नाही आमचं सगळं ठरलं आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी आपली रोखठोक भूमिका मांडली. वाचा सविस्तर..

2.मुख्यमंत्री कोण हा विषय गौण, योग्यवेळी निर्णय जाहीर करु – देवेंद्र फडणवीस</strong>

आम्हाला सत्ता खुर्ची, पदांकरीता नको आहे. मंत्री कोण? मुख्यमंत्री कोण ? या चर्चा मीडियाला करुं द्या. योग्यवेळी योग्य निर्णय सांगू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना म्हणाले. वाचा सविस्तर..

3.सर्व काही समसमान हवे, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्ष इशारा

सामनाच्या आजच्या अग्रलेखातून पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल असा दावा करण्यात आला होता. वाचा सविस्तर..

4.‘बिग बॉस’मधून बिचुकलेंना हाकला, भाजपाच्या माजी नगरसेविकेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बिग बॉस मराठीच्या घरातून अभिजित बिचुकले यांना हाकला अशी मागणी भाजपाच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. वाचा सविस्तर..

5.१३२ वर्षांचे झाले सीएसएमटी: जाणून घ्या या ऐतिहासिक स्थानकाबद्दलच्या २४ खास गोष्टी

 

देशातील सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसटीएमटी स्थानकाला आज १३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. वाचा सविस्तर..