मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
१.मसूद अझहरविरोधात भारताला अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनची साथ
पुलवामा हल्ल्याचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद विरोधात भारताला कूटनीतिक पातळीवर मोठे यश मिळताना दिसत आहे. बुधवारी अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. वाचा सविस्तर..
२. तणाव कमी करण्यासाठी भारत-पाकने पाऊल उचलावे, अमेरिकेचे आवाहन
भारत आणि पाकिस्तान यांच्या वाढत्या तणावामुळे चिंतेत असलेल्या अमेरिकेने दोन्ही देशांना तणाव कमी करण्यासाठी त्वरीत पाऊल उचलण्याचे अपील केले आहे. यापुढे एकानेही सैन्य कारवाई केली तर दोन्ही देशांसाठी ते धोकादायक ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. वाचा सविस्तर..
3. पाककडून कृष्णा घाटीत पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचे चोख प्रत्युत्तर
एकीकडे भारताला चर्चेचे आवाहन करणाऱ्या पाकिस्तानने दुटप्पी धोरण अवलंबले आहे. गुरुवारी सकाळी पाकिस्तानने सीमारेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बेसुमार उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार केला. भारतीय लष्करानेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. वाचा सविस्तर..
४. विंग कमांडर अभिनंदनचे रक्ताळलेले फोटो दाखवणाऱ्या पाकिस्तानला भारताने झापले
भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांचे रक्ताळलेले फोटो आणि व्हिडिओ दाखवणाऱ्या पाकिस्तानला भारताने झापले आहे. वाचा सविस्तर..
५. World Cup 2019 : …तर टीम इंडियाच्या सुरक्षेत वाढ करू! – ICC
World Cup 2019 स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरून विविध चर्चांनी मागील काही दिवस जोर धरला आहे. त्यानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने उपस्थित केलेल्या (BCCI) क्रिकेटपटूंच्या सुरक्षेसंदर्भातील संबंधित सर्व बाबींवर आम्ही लक्ष पुरवू. तसेच गरज भासल्यास खेळाडूंच्या सुरक्षिततेतही अधिक वाढ करू, असे आश्वासन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी दिले आहे. वाचा सविस्तर..
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2019 9:23 am