‘..तर मराठी शिकण्यासाठी अमेरिकेत जावे लागेल!’
मराठी मानसिकतेला हळुवार परंतु बोचरे चिमटे काढत, सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीवर आपल्या खुमासदार शैलीत नेमके काव्यात्म भाष्य करत रामदास फुटाणे आणि अशोक नायगावकर या प्रसिद्ध हास्यकवींनी मंगळवारी ‘लोकसत्ता’च्या ७१ व्या वर्धापनदिन सोहळ्याची संध्याकाळ खुसखुशीत केली. नायगावकरांच्या विनोदाचा नायगारा आणि रामदास फुटाणेंची फोडणी असा दुहेरी हास्ययोग विविध क्षेत्रांतील नामवंतांनी अनुभवला. काही वर्षांनी आपल्याला मराठी शिकण्यासाठी अमेरिकेत जावे लागेल, अशा भेदक वास्तवाची जाणीवही फुटाणे यांनी यावेळी करून दिली. वाचा सविस्तर 

भर समुद्रात.. घुसखोरीविरोधी थरार!

मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर २००९ साली सागरी सुरक्षेसाठी वेगळी यंत्रणा अस्तित्वात आली. आजवर सागरी सुरक्षेच्या २३० मोहिमाही देशभरात पार पडल्या. मात्र एकाच वेळेस देशात अनेक ठिकाणी सागरी हल्ला झाला तर याची चाचपणी कधीच प्रत्यक्षात झालेली नव्हती. याच प्रत्यक्ष चाचपणीसाठी मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून देशव्यापी सागरी सुरक्षेसाठी सी व्हिजिल- २०१९ या दहशतवादविरोधी ऑपरेशनला देशभरात सुरुवात झाली असून हे ऑपरेशन पुढील ३६ तास सुरू राहणार आहे. वाचा सविस्तर 

विनायक परब

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा दर

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज (दि.२३) पुन्हा एकदा दरवाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल १३ पैशांनी तर डिझेलमध्ये २० पैशांनी वाढ झाली आहे. तर दिल्लीत पेट्रोलच्या दरात १३ पैशांनी डिझेलच्या दरात १९ पैशांनी वाढ झाली आहे.   वाचा सविस्तर 

प्रतिकात्मक छायाचित्र

IPS अधिकाऱ्याचा भाऊ दहशतवादी संघटनेत, सुरक्षा दलांनी चकमकीत घातले कंठस्नान
जम्मू- काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात सुरक्षा दलांनी कंठस्नान घातलेल्या तीन पैकी एक दहशतवादी हा आयपीएस अधिकाऱ्याचा भाऊ असल्याचे समोर आले आहे. शमशूल हक असे या दहशतवाद्याचे नाव असून तो गेल्या वर्षी दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. शमशूलचा एक भाऊ हा आयपीएस अधिकारी असून दुसरा भाऊ महाविद्यालयात प्राध्यापक आहे. वाचा सविस्तर

IND vs NZ : नेपियरच्या मैदानात शमीच्या बळींचं शतक, केली अनोख्या विक्रमाची नोंद

भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी आणि वन-डे मालिकेत धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर शमीने न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवातही चांगल्या पद्धतीने केली आहे. नेपियर येथील पहिल्या वन-डे सामन्यात मोहम्मद शमीने आपल्या वन-डे क्रिकेटमधील बळींचं शतक पूर्ण केलं आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टीन गप्टीलचा दुसऱ्याच षटकात त्रिफळा उडवत शमीने आपल्या बळींचं शतक पूर्ण केलं.

यासोबत शमीने आपल्या नावावर एका ऐतिहासीक विक्रमाचीही नोंद केली आहे. वन-डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद 100 बळी घेण्याचा विक्रम शमीने आपल्या नावे केला आहे. वाचा सविस्तर