सांगलीवर पुन्हा पुराचे संकट; एनडीआरएफची दोन पथके दाखल

अलमट्टीतून दोन लाख २० हजार क्युसेक वेगाने विसर्ग

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर, सांगलीला झोपडपून काढले आहे. पावसाची संततधार कायम असल्याने कृष्णा नदीने धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. पूरपरिस्थितीचा धोका ओळखून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. तसचे एनडीआरएफच्या दोन तुकड्याही सांगलीत दाखल झाल्या असून, सांगलीवरील पुराचे संकट गडद होत चालले आहे. वाचा सविस्तर…

US Open : पाच तासांच्या झुंजीनंतर नदालला १९वे ‘ग्रँडस्लॅम’

तब्बल पाच तास रंगलेल्या सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत स्पेनच्या राफेल नदालने यूएस ओपनच्या पुरूष एकेरी मुकुटावर आपले नाव कोरले. नदालने मेदवेदेवचा ७-५,६-३,५-७, ४-६, ६-४ असा पराभव केला. नदालचे हे १९ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. नदालने इटलीच्या माटियो बेरेटिनीचा पराभव करत यूएस ओपनच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. वाचा सविस्तर…

इस्त्रो पुन्हा घेणार चंद्रभरारी… जाणून घ्या या आगामी मोहिमेबद्दल

चांद्रयान-२ मोहिमेतील संपर्क तुटलेले ‘विक्रम लँडर’ चंद्राच्या पृष्ठभागावर आढळले असून त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) शास्त्रज्ञ करीत आहेत. लँडर चांद्रभूमीपासून अवघ्या २.१ कि.मी.वर असताना त्याचा ‘इस्रो’चे मुख्यालय आणि पृथ्वीवरील भूकेंद्रांशी असलेला संपर्क तुटला. एकीकडे लँडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न पुढील १४ दिवसांमध्ये केला जाणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी दिली आहे. एकीकडे चांद्रयान-२ मोहिमेतील लँडरची संपर्काचे प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे इस्त्रो आता पुढच्या चंद्र मोहिमेसाठी तयारी करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. वाचा सविस्तर…

आव्हाने स्वीकारत सरकारची निर्धारपूर्वक वाटचाल : मोदी

केंद्र सरकारचे शंभर दिवस हे विकास, विश्वास तसेच देशापुढील मोठय़ा आव्हानांचे होते. या दिवसांत ठोस निर्णय, निष्ठा व सद्भावनेतून वाटचाल झाली. आव्हानांना कसे सामोरे जायचे हे आम्हाला माहीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. वाचा सविस्तर…

‘या’ अभिनेत्रीमुळे अक्षय कुमारला मिळाली फिल्म इंडस्ट्रीमध्ये एण्ट्री

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आज सर्वाधिक कमाई करणारा आणि यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. अक्षयचा जन्म ९ सप्टेंबर १९६७ रोजी अमृतरसमध्ये एका पंजाबी कुटूंबामध्ये झाला. अक्षयचे वडिल हरी ओम भाटिया सैन्यात होते. आई-वडिलांनी अक्षयचे नाव राजीव भाटिया ठेवले होते. मात्र अक्षयने काही दिवसानंतर त्याचे नाव बदलले आणि अक्षय कुमार ठेवले. अक्षयचे संपूर्ण शिक्षण दिल्लीमध्ये झाले परंतु काही दिवसानंतर तो मुंबईला शिफ्ट झाला. वाचा सविस्तर…