News Flash

मॉर्निंग बुलेटीन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा पाच महत्वाच्या बातम्या

पुरी किनारपट्टीला धडकलं घातक ‘फॅनी’ चक्रीवादळ

सर्वाधिक घातक असे भाकित वर्तविण्यात आलेले ‘फॅनी’ चक्रीवादळ ओदिशातील पुरीच्या किनारपट्टीला धडकले आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. ओदिशाच्या गोपालपूर, पुरी, चांदबाली, बालासोर आणि अन्य भागांमध्ये सोसायटयाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत १० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. वाचा सविस्तर

IPL 2019 MI vs SRH : ‘सुपर’ विजयासह मुंबई ‘प्ले-ऑफ्स’ फेरीत; हैदराबाद पराभूत

IPL 2019 MI vs SRH Updates : मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मनीष पांडेने शेवटच्या चेंडूवर लगावलेल्या षटकाराच्या बळावर हैदराबादने निर्धारित २० षटकात सामना बरोबरीत सोडवला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ८ धावा केल्या. ९ धावांचे आव्हान मुंबईने सहज पूर्ण केले आणि ‘प्ले-ऑफ्स’मध्ये स्थान पटकावले. वाचा सविस्तर

मोदी यांना दिलासा देण्याचा निर्णय एकमताने नव्हे!

निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन तक्रारींसंबंधात निर्दोष जाहीर केले असले, तरी हा निर्णय एकमताने झाला नसल्याची विश्वसनीय माहिती ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला मिळाली आहे. वाचा सविस्तर

सीएसएमटी स्थानकात बफरला धडक दिलेल्या लोकलच्या मोटरमनचा मृत्यू

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात बफरला किरकोळ धडक दिलेल्या मोटरमनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पंकज गुलाबचंद इंदोरा असे या मोटरमनचे नाव होते. ते मूळचे जयपूरचे होते तर मुंबईतल्या जीटीबी नगर भागात असलेल्या रेल्वे वसाहतीत ते रहात होते. वाचा सविस्तर

…म्हणून मृणाल कुलकर्णी म्हणतेय, ‘वेलकम होम’

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. मृणाल कुलकर्णीने अभिनयाप्रमाणेच दिग्दर्शन, लेखन या क्षेत्रामध्येही नशीब आजमावलं त्यामुळे तिचा स्वतंत्र असा एक चाहतावर्ग निर्माण झाला आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. आज इतके वर्ष कलाविश्वामध्ये स्वत:च स्थान निर्माण केलेली मृणाल कुलकर्णी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाली आहे. मृणाल लवकरच ‘वेलकम होम’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.वाचा सविस्तर

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 9:17 am

Web Title: morning bulletin read top 5 news of state national 2
Next Stories
1 मसूदवर बंदीसाठी चीनने घातली होती पाकवर हल्ला न करण्याची अट
2 शोपियनमध्ये सुरक्षा पथकं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
3 Updates Fani Cyclone: फॅनी चक्रीवादळामुळे तिघांचा बळी, १० लाख नागरिकांचे स्थलांतर
Just Now!
X