03 March 2021

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मोदींवर टीका पासून तिहेरी तलाक विधेयकापर्यंतच्या पाच महत्त्वाच्या बातम्या

पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, २०१८ मधील सर्वात स्वस्त पेट्रोल आज

पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा २०१८ मध्ये भडका उडाला होता. गेल्या काही दिवसांत इंधन दरात सातत्याने घट होऊन पेट्रोल आणि डिझेलचे दर वर्षभरातील नीचांकी पातळीवर आले आहेत. २०१८ मधील सर्वात स्वत पेट्रोल आज मिळणार आहे. मुंबईमध्ये पेट्रोल आज ७४.४७ रूपये प्रतिलिटर आहे. मुंबईत प्रथमताच पेट्रोलदराने प्रतिलिटर ७५ रुपयांच्या खालील पातळी गाठली आहे. दिल्लीमध्ये आज पेट्रोल प्रतिलिटर ६८. ८४ रूपये आहे. वाचा सविस्तर

मोदींकडून सत्तेचा गैरवापर
पुन्हा सत्ता मिळेल की नाही याची खात्री नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेच्या गैरवापराचा अतिरेक करून विरोधकांना अडचणीत आणत आहेत. हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहारातील आरोपी मिशेलने घेतलेले सोनिया गांधी यांचे नाव हा असाच प्रकार असावा.

मिशेलने विशिष्ट व्यक्तीचे नाव घ्यावे, यासाठी दबाव आणला गेला असावा, त्यामागे कटकारस्थान असावे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केला.  वाचा सविस्तर

 

‘तिहेरी तलाक’ विधेयक आज राज्यसभेत, भाजपा-काँग्रेसकडून खासदारांना ‘व्हिप’

लोकसभेत संमत झालेले तिहेरी तलाक विधेयक केंद्र सरकार आज (सोमवार) राज्यसभेत सादर करणार आहे. संसदेत राजकीय वादाचे कारण बनलेल्या या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलीच तयारी केली आहे.

या विधेयकात तिहेरी तलाक देणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. हे विधेयक सदनात येण्यापूर्वी संसदीय समितीकडे ते पाठवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तत्पूर्वी भाजपाकडून विजय गोयल यांनी राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक संमत होण्यासाठी सर्व पक्षांशी संपर्क साधला आहे. वाचा सविस्तर

कादर खान यांच्या मृत्यूच्या अफवा, मुलाकडून खुलासा

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते कादर खान यांच्‍या निधनाची अफवा उडाली. सोशल मिडियावर कादर खान यांच्‍या निधनाची बातमी वा-यासारखी पसरली आणि चाहते त्‍यांना श्रद्धांजली अर्पण करु लागले.

 

पण अखेर कादर खान यांच्या मुलाने या सर्व वृत्ताचे खंडण केले आहे. कादर खान यांच्या निधनाची बातमी ही केवळ अफवा असल्याचे मुलगा सरफराज खान यांनी स्पष्ट केलं आहे. वाचा सविस्तर

रोहित शर्माला कन्यारत्न

भारताचा उपकर्णधार आणि तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. रोहित शर्माची पत्नी रितिकाने गोडंस अशा मुलीला जन्म दिला आहे.

रोहित शर्माने आपली स्पोर्ट्स मॅनेजर राहिलेली रितिका सजदेहसोबत १३ डिसेंबर २०१५ रोजी लग्न केले होते. वाचा सविस्तर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 9:10 am

Web Title: morning bulletin top 5 important news national
Next Stories
1 पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, २०१८ मधील सर्वात स्वस्त पेट्रोल आज
2 पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय लष्कराने मोठ्या हल्ल्याचा कट उधळला
3 ‘तिहेरी तलाक’ विधेयक आज राज्यसभेत, भाजपा-काँग्रेसकडून खासदारांना ‘व्हिप’
Just Now!
X