भारतीयांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलणार : बोरिस जॉन्सन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉन्सन यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून चर्चा केली होती. त्यानंतर मंगळवारी मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी त्यांनी लंडनमध्ये स्वातंत्र्य दिवसाच्या कार्यक्रमादरम्यान भारतीयांसोबत झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर जोर दिला. दरम्यान, भारतीय उच्चायुक्तालय, तेथील कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असं आश्वासन त्यांनी यावेळी मोदी यांना दिलं. वाचा सविस्तर..

समाजमाध्यमांवर आधारसक्ती?

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यासह सर्व समाजमाध्यमांना आधार क्रमांकाशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न असून विविध राज्यांत याविरोधात दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यासाठी फेसबुकने धाव घेतली आहे. त्यांची याचिका न्यायालयाने दाखल करून घेत केंद्र सरकारसह गूगल, ट्विटर, यू-टय़ूब आणि इतरांवर नोटीस बजावली आहे. वाचा सविस्तर..

चांद्रयानाकडून पहिला अवघड टप्पा पार

चांद्रयान २ हे चंद्राच्या कक्षेत पाठवण्यात मंगळवारी यश आले. या मोहिमेतील हा पहिला अवघड टप्पा असल्याने ही ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे. या महत्त्वाकांक्षी प्रयत्नात काळजाचे ठोके चुकण्याचाच अनुभव आला, असे इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वाचा सविस्तर…

अजिंक्य रहाणे की रोहित शर्मा?

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात होत असून कर्णधार विराट कोहलीसमोर अजिंक्य रहाणे की रोहित शर्मा या मुंबईच्या अनुभवी खेळाडूंना अथवा पाचव्या गोलंदाजाला संधी द्यायची, याबाबतचा पेचप्रसंग उभा राहिला आहे. वाचा सविस्तर…

‘सेक्रेड गेम्स २’मधील या दृश्यामुळे दुखावल्या धार्मिक भावना, गुन्हा दाखल

‘सेक्रेड गेम्स २’ या वेब सीरिजमुळे सोशल मीडियावरील ‘कॉन्ट्रोव्हर्सी किंग’ अशी ओळख असलेला बॉलिवूडमधील दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा एका नव्या वादात अडकला आहे. या वेब सीरिजमधील एका दृष्यामुळे शीख समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत अशी तक्रार भाजपाने केली आहे. दिल्ली भाजपाचे प्रवक्ते तेजेंद्र पाल सिंग बग्गा यांनी अनुराग कश्यप यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. वाचा सविस्तर..