News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा पाच महत्वाच्या बातम्या

मोदी भारतात परतले, जेटलींच्या कुटुंबाना भेट देण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पहाटे भारतात परतले

फ्रान्समध्ये झालेल्या जी-७ परिषदेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पहाटे भारतात परतले. मायदेशात परतल्यानंतर मोदी प्रथम माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या कुटुंबियांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जी-७ परिषदेला गेल्यामुळे मोदींना अरूण जेटलींच्या अंत्यसंस्कारला उपस्थित राहता आले नव्हते. वाचा सविस्तर…

बँक घोटाळा : शरद पवारांवरही गुन्हा दाखल होणार?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेही अडचणीत येण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ, पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७६ जणांचा समावेश आहे. या घोटाळ्यात संबंधित खात्याचे अधिकारी आणि तत्कालीन मंत्र्यांची नावंही आरोपी म्हणून देण्यात आल्याचा दावा तक्रारदाराच्या वकिल माधवी अय्यपम यांनी केला आहे. त्यामुळे तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दाखल गुन्ह्यत कदाचित सूत्रधारांची नावे नसतील मात्र तपास यंत्रणेने ती शोधून, त्यांचा सहभाग स्पष्ट करून कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार, याचिकाकर्ते अरोरा यांनी केली आहे. वाचा सविस्तर…

अ‍ॅमेझॉन भीषण आग : ब्राझीलने नाकारली जी-७ देशांची मदत

अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील वणवे विझवण्यासाठी जी ७ देशांनी २० दशलक्ष युरो (२२ दशलक्ष डॉलर्स) देण्याचे मान्य केले होते. मात्र, ब्राझीलने जी-७ देशांची मदत नाकाराल्याचं वृत्त आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी मदत घेण्यास नकार दिला आहे, असं वृत्त वृत्तसंस्था एएनआयने दिलं आहे. वाचा सविस्तर..

कहर! पाकिस्तानने ‘United Nations’ ऐवजी ‘UNO गेम’कडे केली भारताची तक्रार

नेटकऱ्यांनी केली पाकिस्तानवर टीका

भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. भारतावर दबाव आणण्यासाठी पाकिस्तान सर्व स्तरांमधून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांचा प्रत्येक डाव त्यांच्यावर उलटा पडत असल्याचे दिसत आहे. असाच एक प्रकार पुन्हा समोर आला आहे. यावेळेस पाकिस्तान सिनेटचे सदस्य रेहमान मलिक यांनी भारतावर टिका करताना मोठा गोंधळ घालता आहे. पाकिस्तानमधील माजी मंत्री असणाऱ्या मलिक यांनी ट्विटवरुन भारतावर टीका करताना मलिक यांनी संयुक्त राष्ट्रांचे म्हणजेच युनायडेट नेशन्सचे ट्विटर हॅण्डल टॅग करण्याऐवजी उनो गेमचे ट्विटर हॅण्डल टॅग केले आहे. वाचा सविस्तर…

सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार; शिवसेनेने रोखला जानकरांवर बाण!

अभिनेता संजय दत्त राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचा हवाला देत शिवसेनेने पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना शेलक्या शब्दात टोले लगावले. संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असून पक्षाचा प्रचारही करणार आहे. जानकरांच्या दाव्याने करमणूक होत आहे. पण सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार, असा सवाल करीत शिवसेनेने जानकरांवर बाण रोखला आहे. वाचा सविस्तर..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 9:14 am

Web Title: morning bulletin top 5 news avb 95 14
Next Stories
1 कहर! पाकिस्तानने ‘United Nations’ ऐवजी ‘UNO गेम’कडे केली भारताची तक्रार
2 अ‍ॅमेझॉन भीषण आग : ब्राझीलने नाकारली जी-७ देशांची मदत
3 मोदी भारतात परतले, जेटलींच्या कुटुंबीयांना भेट देण्याची शक्यता
Just Now!
X