News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा पाच महत्वाच्या बातम्या

पाच वर्षांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेली कामे दाखवा- डॉ. अमोल कोल्हे

मी पुन्हा मुख्यमंत्री होणार असे म्हणत जनादेश यात्रा काढणारे मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिले आहेत

मी पुन्हा मुख्यमंत्री होणार असे म्हणत जनादेश यात्रा काढणारे मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिले आहेत. पाच वर्ष कामे केली असती तर हि वेळ आली नसती. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे प्रदुषण मुख्य महाराष्ट्र करण्याची भाषा करत आहेत. मग पर्यावरण मंत्री रामदास कदम काय करत होते. पाच वर्षांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेली १५ कामे दाखवा असे म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना भाजपवर निशाणा साधला. ते कर्जत येथे शिवस्वराज्य यात्रे दरम्यान आयोजीत सभेत बोलत होते. वाचा सविस्तर…

मेट्रो-३ची कारशेड आरेतच!

कांजुरमार्ग येथील जागेचा विचार हा मेट्रो-३ प्रकल्पासाठी नाही, तर मेट्रो-६ प्रकल्पासाठी करण्यात आला होता, असे राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केले. मेट्रो-३ची कारशेड आरेऐवजी कांजुरमार्ग येथे बांधायचे झाल्यास ते वाहतुकीच्या, खर्चाच्या आणि वेळेच्या दृष्टीनेही व्यवहार्य ठरणार नाही. वाचा सविस्तर…

मुंबईतील अनेक भागांतून गॅस गळतीच्या तक्रारी

मुंबईतील अनेक ठिकाणांहून गुरूवारी रात्री गॅस गळतीच्या तक्रारी आल्याची माहिती समोर आली आहे. मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकाला अशा अनेक ठिकाणांहून गॅस गळतीच्या तक्रारींचे फोन अग्निशमन दलाला करण्यात आले. दरम्यान, या तक्रारींची दखल घेतल अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच गॅस गळती नेमकी कोणत्या ठिकाणी होत आहे याचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे. वाचा सविस्तर…

स्मिथचे तंत्र जटिल, परंतु मानसिकता योजनाबद्ध -सचिन

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथचे तंत्र जटिल आहे, परंतु मानसिकता योजनाबद्ध असल्याचे मत भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. अ‍ॅशेस मालिकेमधील स्मिथच्या दिमाखदार पुनरागमनाचे सचिनने ‘ट्विटर’च्या माध्यमातून कौतुक केले आहे. चेंडू फेरफारप्रकरणी एक वर्ष बंदीची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर स्मिथने अ‍ॅशेस मालिकेत ११०.५७च्या सरासरीने एकूण ७७४ धावा केल्या आहेत. ‘‘पहिल्या कसोटीत इंग्लिश गोलंदाजांनी स्लिप आणि गलीत स्मिथचा झेल मिळावा म्हणून व्यूहरचना आखली. परंतु डावी यष्टीचे रक्षण करीत स्मिथ योग्य फटके खेळला. मग लॉर्ड्सवर लेग स्लिपला क्षेत्ररक्षण ठेवत जोफ्रा आर्चरने आखूड टप्प्यांचे चेंडू स्मिथला टाकले,’’ असे सचिनने म्हटले आहे. वाचा सविस्तर…

…म्हणून वयाची ४० उलटल्यानंतरही अक्षय खन्नाने केलं नाही लग्न

बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाचा नुकताच ‘सेक्शन 375’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना पाहायला मिळत आहे. अक्षय खन्नाने या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन देखील केले होते. दरम्यान त्याने एका मुलाखतीमध्ये त्याच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला आहे. वाचा सविस्तर…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 9:28 am

Web Title: morning bulletin top 5 news avb 95 18
Next Stories
1 संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान पुन्हा तोंडघशी
2 किशोरवयीन पर्यावरण कार्यकर्तीचा लढा अमेरिकी काँग्रेसमध्ये
3 विक्रम लॅन्डर पाठवलेल्या भागाची ‘नासा’कडून छायाचित्रे; विश्लेषण सुरू
Just Now!
X