अकरावी प्रवेशाच्या तिढय़ावर प्रवेश क्षमतावाढीचा पर्याय

नामांकित महाविद्यालयांत जागा वाढविण्याबाबत चाचपणी

अकरावी प्रवेशाचा तिढा सोडवण्यासाठी नामांकित महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवण्याच्या पर्यायाची शिक्षण विभागाकडून चाचपणी करण्यात येत आहे. प्रवेश क्षमतेत वाढ करण्याबाबत महाविद्यालयांचे प्राचार्य आणि व्यवस्थापनाशी चर्चा करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी सांगितले. दरम्यान, इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांचे लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्याचा शासनहट्टही अद्याप कायम आहे. वाचा सविस्तर…

मोसमी पावसाला दोन दिवसांचा विलंब

‘वायू’ चक्रीवादळाने दिशा बदलली

अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळ गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याला धडकण्याची चिन्हे असतानाच त्याने किंचितशी दिशा बदलली आहे. मात्र, वाऱ्यांची गती वाढलेली असल्याने राज्यात कोकण किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा परिणाम दिसतो आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातील नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या आगमनाला सुमारे दोन दिवसांचा विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. १४ किंवा १५ जूनला राज्यात मोसमी वारे दाखल होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर…

‘फोर्ब्स २०००’ सूचीत ५७ भारतीय कंपन्या

अमेरिकी-चिनी कंपन्यांचा जागतिक वरचष्मा

जगातील आघाडीच्या २,००० कंपन्यांमध्ये भारतातील ५७ कंपन्यांना स्थान मिळाले असून ‘फोर्ब्स’ नियतकालिकाने तयार केलेल्या या सूचित रिलायन्स, एचडीएफसी अव्वल स्थानी आहेत. वाचा सविस्तर…

अमिताभ बच्चन, अदनान सामी यांनाच हॅकर्सनी लक्ष्य का केलं जाणून घ्या

अय्यिलदिज टीम सायबर आर्मीने दोन्ही ट्विटर अकाऊंट हॅक केल्याची जबाबदारी स्विकारली होती

बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट सोमवारी रात्री हॅक करण्यात आलं होतं. यानंतर काही तासातच हायक अदनाम सामी यांचंही ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. अय्यिलदिज टीम सायबर आर्मीने दोन्ही ट्विटर अकाऊंट हॅक केल्याची जबाबदारी स्विकारली होती. या ग्रुपबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. वाचा सविस्तर…

शास्त्री गुरुजींना BCCI कडून बक्षीस, प्रशिक्षकपदावर मुदतवाढ

४५ दिवसांनी करार वाढवला

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. BCCI ने प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार ४५ दिवसांनी वाढवला आहे. रवी शास्त्री यांच्यासोबत त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनाही मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. २०१७ साली रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदावर नियुक्ती करण्यात आली होती. २०१९ विश्वचषकापर्यंत त्यांचा करार करण्यात आला होता. मात्र भारतीय संघाचं विश्वचषकानंतरचं व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता शास्त्री आणि त्यांच्या टीमला मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. वाचा सविस्तर…