01 March 2021

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा पाच महत्वाच्या बातम्या

मुंबईसह तीन जिल्ह्यात सुटी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय

अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे राज्य शासनातर्फे कळविण्यात आले आहे. गेल्या १२ ते १४ तासांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. एवढंच नाही तर ठाण्यातही कोसळधार आहे. त्याचमुळे हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी घोषणा केली आहे.

मुंबईसह ठाणे,कोकण परिसरात येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. वाचा सविस्तर…

पावसाने उडवली दाणादाण, लोकल सेवा ठप्प; सरकारी सुट्टी जाहीर

मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते मात्र मुंबईत रात्रभर पडलेल्या पावसामुळे या लोकल सेवेचे तीन तेरा वाजवले आहेत. आज पहाटेपासूनच लोकल सेवा बंद असल्याच्या घोषणा विविध स्टेशनवर केल्या जात आहेत. डोंबिवली ते ठाणे हे स्लो लोकलने वीस मिनिटात कापले जाणारे अंतर कापण्यासाठी दीड ते दोन तास लागत आहेत. मध्य रेल्वेच्या सर्व लोकल्स ठाण्यापर्यंत मुंगीच्या गतीने जात असून त्यापुढे पुढील सूचना मिळेपर्यंत लोकलसेवा बंद ठेवण्यात आली आहे. मुंबईतल्या लोकलसेवेला पावसाने ब्रेक लावला आहे. वाचा सविस्तर…

WC 2019: भारतीय संघात आज दोन मोठे बदल होण्याची शक्यता, ‘या’ खेळाडूंवर असेल नजर

इंग्लंडकडून ३१ धावांनी पराभव झाल्यानंतर भारतीय संघ आज बांगलादेशविरोधात मैदानात उतरणार आहे. यावेळी भारतीय संघात दोन मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. आज भारत बांगलादेशविरोधात विश्चचषक स्पर्धेतील आठवा सामना खेळणार आहे. भारताने आतापर्यंत सातपैकी पाच सामने जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. गुणतालिकेत भारतीय संघ सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत उर्वरित दोन्ही सामने जिंकून गुणतालिकेतील आपली जागा अबाधित ठेवण्याचा विराट सेनेचा प्रयत्न असेल. दरम्यान बांगलादेशविरोधात मैदानात उतरताना भारतीय संघात दोन मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर..

मुंबई: मालाडमध्ये भिंत कोसळून १६ जण ठार, १३ जखमी

मुंबईतल्या मालाड भागात भिंत कोसळून १६ जण ठार झाले आहेत. तर १३ जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी अग्निशमन दल आणि NDRF च्या टीमकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मालाडजवळच्या कुरार भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी आता ढिगारा उपसण्याचं आणि मदत करण्याचं काम सुरू आहे. वाचा सविस्तर…

आयुषमानची बहिण म्हणाऱ्यांना ताहिराचे सडेतोड उत्तर

अभिनेता आयुष्मान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यप-खुरानाला स्टेज 0 ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. ताहिराला उपचारादरम्यान तिचे केस गमवावे लागले होते. मात्र या परिस्थितीतही ती खंबीरपणे न डगमगता उभी राहिली. विशेष म्हणजे केस गमावल्यानंतर तिने कधीही विग वैगरे वापरला नाही. जशी आहे, तशी साऱ्यांना सामोरी गेली. उपचारानंतर ताहिरा बॉयकट हेअरस्टाईलमध्ये दिसत होती. पण काही नेटकऱ्यांनी तिच्या या लूकची खिल्ली उडवली आहे. आता ताहिराने तिचा मौन सोडत ट्रोलर्सला चांगलेच उत्तर दिले आहे. वाचा सविस्तर..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 10:05 am

Web Title: morning bulletin top 5 news avb 95 4
Next Stories
1 प्रत्यार्पणाविरुद्ध मल्याच्या अपिलावर आज सुनावणी
2 अखंडतेचा भंग केल्यास जशास तसे प्रत्युत्तर : शहा
3 सर्वोच्च न्यायालयात १६ जुलैला सुनावणी
Just Now!
X