मुंबईत फक्त १०६ खड्डे! पालिकेचा दावा
स्थायी समितीमध्ये बुधवारीही खड्डय़ांच्या विषयावरून नगरसेवकांनी प्रशासनाला घरचा आहेर दिला
पावसाला सुरुवात झाल्यापासून मुंबईत ठिकठिकाणच्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्याचे मुंबईकरांचे म्हणणे असले तरी पालिकेच्या लेखी मात्र केवळ १०६ खड्डेच उरले आहेत. पालिकेकडे रस्त्यावरील खड्डय़ाच्या एकूण १०७० तक्रारी व्हॉट्सअॅप, ट्विटर अशा माध्यमातून आल्या आहेत त्यापैकी ९६४ तक्रारी सोडवण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. वाचा सविस्तर...
‘अमेठीतील पराभवाला स्थानिक नेते जबाबदार’
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेठीतील त्यांच्या पराभवाला स्थानिक नेत्यांना जबाबदार धरले आहे. जनतेपासून त्यांचा संपर्क तुटल्याचे राहुल यांनी येथील दौऱ्यात स्पष्ट केले. अमेठी हे माझे घर आणि कुटुंब आहे. त्यामुळे अमेठीवासीयांशी फारकत घेणार नाही, अशी ग्वाही राहुल यांनी दिल्याचे युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नदीम अश्रफ जायसी यांनी सांगितले. वाचा सविस्तर...
पश्चिम रेल्वेला बळकटी ! जानेवारीपासून अंधेरी-विरार १५ डबा लोकल
केंद्रीय अर्थसंकल्पात पश्चिम उपनगरीय रेल्वे प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. अंधेरी ते विरार धिम्या मार्गावर पंधरा डबा प्रकल्पाच्या कामांसाठी १२ कोटी, तर लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी असलेल्या जोगेश्वरी टर्मिनससाठी दहा लाख रुपये मंजूर केले आहेत. अंधेरी ते विरार मार्गावर पंधरा डबा लोकल जानेवारी २०२० पासून धावतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली. वाचा सविस्तर…
World Cup 2019 : धोनीच्या निवृत्तीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर विराट कोहली म्हणतो….
भारतीय संघाचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान अखेर संपुष्टात आलं आहे. केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाने भारतावर उपांत्य फेरीत १८ धावांनी मात केली. २४० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ २२१ धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारताचे दिग्गज फलंदाज आज न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर पुरते कोलमडले. सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने आपल्या संघाचा पराभव मान्य करत न्यूझीलंडचं कौतुकही केलं. वाचा सविस्तर…
Super 30 movie review: सामान्य गणितज्ञाची असामान्य कथा
आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ३० मुलांना एकत्र आणून त्यांना आयआयटी विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्यासाठी गणितज्ञ आनंद कुमार हे प्रयत्न करत असतात. चित्रटाची संपूर्ण कथा ही आनंद कुमार यांचे मुलांना शिकवण्यासाठी घेण्यात आलेल्या प्रयत्नांभोवती फिरताना दिसते. परंतु या ३० मुलांना आयआयटी विद्यापीठात प्रवेश मिळतो का? वाचा सविस्तर…
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 11, 2019 10:00 am