डोंगरी दुर्घटना: १४ जणांचा मृत्यू, ९ जण जखमी

ढिगाऱ्याखाली तब्बल ५० जण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली होती.

डोंगरी येथे केसरबाई इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांता मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. सध्या जखमींना जे.जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत बचाव कार्य सुरू होते. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. वाचा सविस्तर…

..तर आणखी एक सुपर ओव्हर आवश्यक!

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याप्रमाणे अतिकठीण परिस्थिती उद्भवल्यास सरस एकूण सीमापार फटक्यांच्या संख्येऐवजी आणखी एक सुपर ओव्हर खेळवण्यात यावी, अशी सूचना मंगळवारी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने केली आहे. वाचा सविस्तर…

प्रवासी वाढले, बसची मात्र प्रतीक्षाच

भाडेकपात केल्यानंतर बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ होतच आहे. आठवडाभरात ८ लाख ६५ हजार प्रवाशांची भर पडली असल्याचे बेस्ट उपक्रमाने सांगितले. प्रवासी वाढत असले, तरी अपुऱ्या बसगाडय़ांमुळे प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळत उभे राहावे लागत आहे. बसगाडय़ांचा तुटवडा पाहता ऑगस्ट महिन्यापासून भाडेतत्त्वावरील बसगाडय़ा दाखल होणार आहेत. या बसगाडय़ांवर बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना चालक म्हणून संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर…

कुराणचं वाटप करायला सांगणं हा माझ्या मुलभूत अधिकाराचा भंग : रिचा पटेल

(छायाचित्र सौजन्य – एएनआय)

”मी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करते, पण फेसबुक पोस्टसाठी दुसऱ्या धर्माच्या (इस्लाम) केंद्रावर जाऊन त्यांचा धर्मग्रंथ कुराणच्या प्रती वाटण्याच्या आदेशामुळे मी अस्वस्थ झाले आहे. मला खूप वाईट वाटतंय. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते पण त्याचसोबत मला उच्च न्यायालयात माझी बाजू मांडण्याचाही अधिकार आहे. कुणी माझ्या मुलभूत अधिकारांचा भंग कसंकाय करु शकतं? फेसबुकवर स्वतःच्या धर्माबाबत लिहिणं कोणता गुन्हा आहे? मी एक सामान्य विद्यार्थिनी असतानाही मला अचानक अटक करण्यात आली”. रांची विमेन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी रिचा भारती उर्फ रिचा पटेल हिने ‘बीबीसी’शी बोलताना ही प्रतिक्रिया दिलीये. वाचा सविस्तर..

शरद पोंक्षेंनी केली कर्करोगावरही मात; पुन्हा रंगभूमीवर येणार

शरद पोंक्षे

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार शरद पोंक्षे यांनी कर्करोगावर मात केली असून पुन्हा एकदा ते रंगभूमीवर आपली कला सादर करण्याठी सज्ज झाले आहेत. गेल्या डिसेंबर महिन्यापासून शरद पोंक्षे हे कर्करोगाचा सामना करत आहेत. कर्करोगावरील उपचारानंतर ते पुन्हा एकदा नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर येणार आहेत. दरम्यान, बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात एका नाटकाच्या तालमीसाठी ते आले होते. वाचा सविस्तर..