PNB Scam: सतर्क बँक कर्मचाऱ्यामुळेच पोलिसांच्या जाळ्यात अडकला नीरव मोदी
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याचा सूत्रधार हिरे व्यापारी नीरव मोदी याला स्कॉटलँड यार्डने लंडनमध्ये अटक केली असून नीरव मोदी बँकेत खाते उघडण्यासाठी गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला, अशी माहिती समोर आली आहे. नीरव मोदी बँकेत पोहोचताच एका कर्मचाऱ्याने त्याला ओळखले आणि त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. वाचा सविस्तर

CRPF मधील जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, तिघांचा मृत्यू

जम्मू- काश्मीरमधील उधमपूर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर एका जवानाने क्षुल्लक वादातून सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून गोळीबार करणाऱ्या जवानाने आत्महत्येचा प्रयत्न देखील केला आहे. उधमपूर येथील बट्टल बलियान येथे सीआरपीएफचे तळ असून या तळावर सीआरपीएफमधील १८७ बटालियनमधील जवान होते.  वाचा सविस्तर

तब्बल १५ कोटी लोकांनी रोजगार गमावला

गेल्या सात वर्षांमध्ये तब्बल १५ कोटी लोकांचा रोजगार गेला आहे. त्यात ७.३ टक्के पुरुष मजूर आणि ३.३ टक्के महिलांचा समावेश आहे. ही धक्कादायक माहिती पीरिओडिक लेबर फोर्स सर्वेमध्ये (पीएलएफएस) समोर आली आहे. विशेष म्हणजे, याची नुकसान भरपाई करण्यासाठी शहरांमध्येही रोजगार वाढला नसल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कामगार क्षेत्रातील रोजगाराच्या संधीसंदर्भात २०१७-१८ चा पीएलएफएस सव्‍‌र्हे नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. वाचा सविस्तर

(संग्रहित छायाचित्र)

पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल

प्राप्तीकर विभागाने पॅन कार्डच्या नियमात तीन मोठे बदल केले आहेत. येत्या एक एप्रिलपासून हे बदल होणार आहेत. पॅन कार्ड आधार कार्डला अद्यपही लिंक केलेले नसेल तर अनेक अडचणी उद्भवू शकतात. आधारला पॅन न जोडल्यास आयटी कलम १३९(ए) अंतर्गत ते निष्क्रिय समजले जाईल. प्रत्यक्ष कर संचालक मंडळांनी आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची मर्यादा वाढवून ३१ मार्च २०१९ पर्यंत केली आहे. प्राप्तीकर विभागानुसार आर्थिक वर्षांत २.५ लाखाहून अधिकची पैशांची उलाढाल असल्यास पॅन कार्ड काढणे गरजेचे आहे. वाचा सविस्तर

(संग्रहित छायाचित्र)

रोनाल्डोची असभ्य वर्तन प्रकरणी चौकशी होणार

जुवेंटसचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डोला आपले मैदानावरील असभ्य वर्तन चांगलेच भोवणार असे दिसत आहे. चॅम्पियन्स लीगच्या राउंड ऑफ १६ च्या सामन्यावेळी रोनाल्डोने हॅट्ट्रिक केली.

या हॅट्ट्रिकवेळीच्या एका गोलच्या सेलिब्रेशनवेळी त्याने असभ्य वर्तन केले याच प्रकरणाची शिस्तपालन अधिकारी चौकशी करणार आहेत. वाचा सविस्तर