ओसामा बिन लादेनच्या मुलावर अमेरिकेने जाहीर केले १ दशलक्ष डॉलरचे इनाम

ओसामा बिन लादेनचा अमेरिकेने खात्मा केला मात्र त्याचा मुलगा अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरला आहे. ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा याने आता ओसामाची जागा घेतली आहे. ओसामा बिन लादेनच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हामजा कट रचतो आहे, त्याने अमेरिकेविरोधात काही दहशतवादी कारवाई करण्याआधीच तो अमेरिकेला हवा आहे. त्याचमुळे १ दशलक्ष डॉलरचा इनाम अमेरिकेने जाहीर केला आहे. वाचा सविस्तर

वैमानिक अभिनंदन परतणार भारतात, वाघा बॉर्डरकडे देशाचं लक्ष

पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या भारतीय वैमानिक अभिनंदन यांची सुटका कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही घोषणा केली आहे. संसदेत बोलताना इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचं सांगितलं. आज अभिनंदन भारतात परतणार आहेत. वाचा सविस्तर

सरकारने युट्युबवरुन हटवले वैमानिक अभिनंदन यांचे ११ व्हिडिओ

भारतीय वायूसेनेच्या मिग २१ या लढाऊ विमानाचे वैमानिक अभिनंदन यांच्याशी निगडीत काही व्हिडिओज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने युट्यूबवरुन हटवले आहेत. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याप्रकरणी माहिती दिली. विंग कमांडर अभिनंदन यांचे अपमानजनक व्हिडिओ पाकिस्तानकडून युट्युबवर अपलोड केल्याची आमच्याकडे तक्रार आली होती. आम्ही युट्युबला याप्रकरणी एक नोटीस पाठवली होती. त्याप्रमाणे त्यांनी अंमलबजावणी करत अभिनंदन यांच्याशी निगडीत ११ व्हिडिओ हटवले आहेत, अशी माहिती प्रसाद यांनी दिली. वाचा सविस्तर

मुंबईतून बेपत्ता झालेल्या ९२० मुला-मुलींचे गूढ कायम

गेल्या सात वर्षांमध्ये मुंबईतून तब्बल २० हजार अल्पवयीन मुले बेपत्ता झाली होती. त्यापैकी ९२० मुला-मुलींचा शोध अद्यापही लागलेला नाही. पोलिसांनी या मुलांचा शोध घेण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ हाती घेतले आहे. या मोहिमेच्या यंदाच्या सातव्या टप्प्यात पहिल्या आठवडय़ातच ४८ मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होण्याचे आणि विविध कारणांसाठी त्यांचे अपहरण करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. २०११ ते २०१८ या सात वर्षांमध्ये मुंबईतून तब्बल २० हजार ६८७ अल्पवयीन मुले – मुली बेपत्ता झाली होती. त्यात ८ हजार ७८ मुले आणि १२ हजार २०९ मुलींचा समावेश होता. वाचा सविस्तर

वादविवादामुळे अधिक परिपक्व झालो – लोकेश राहुल

दूरचित्रवाणीवरील एका कार्यक्रमात महिलांबद्दल अश्लील शेरेबाजी केल्यामुळे भारताचा सलामीवीर लोकेश राहुल वादात सापडला होता. मात्र या वादविवादामुळे मला अधिक परिपक्व होण्याची संधी मिळाली. तसेच भारतीय संघातून खेळणे किती मोलाचे आहे, याची किंमत उमगली, अशा शब्दांत राहुलने आपल्या भावना व्यक्त केल्या.या वादानंतर बंदीची शिक्षा भोगलेल्या राहुलला भारतीय कसोटी संघातील स्थानही गमवावे लागले होते. त्यानंतर भारत-अ संघाकडून चमकदार कामगिरी करत त्याने राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे. वाचा सविस्तर