आलात तर सोबत नाही तर तुमच्याशिवाय, भाजपाने शिवसेनेला दिली डेडलाइन

सत्तेत राहून नेहमी विरोधकांच्या भूमिकेत असणाऱ्या शिवसेनेविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी युती करायची की नाही यासाठी भाजपाने शिवसेनेला डेडलाइन दिली आहे. भाजपाने 31 जानेवारीपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचार करुन आपला निर्णय कळवण्यास सांगितलं असल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भाजपा शिवसेनेच्या निर्णयाची वाट पाहत आहे. शिवसेनेकडून वारंवार टीका होत असतानाही भाजपाने मात्र सबुरीची भूमिका घेतली होती. पण अखेर भाजपाने आक्रमक भूमिका घेण्याचं ठरवलं आहे. दिल्लीत बुधवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील भाजपा खासदारांची बैठक पार पडली. यावेळी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेच्या अवास्तव मागण्या मान्य करण्यासाठी पक्ष झुकणार नसल्याचं स्पष्ट केलं. वाचा सविस्तर

राज ठाकरेंवर तरुणाची आक्षेपार्ह टीका, मनसैनिकांनी दिली उठाबशा काढण्याची शिक्षा

सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अधिकृत पेजवर आक्षेपार्ह शब्दात टीका करणाऱ्या एका तरुणाला पुण्यातील मनसैनिकांनी 50 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. तसेच त्याला सोशल मीडियावर माफी देखील मागायला लावण्यात आली असून यापुढे सोशल मीडियावर राज ठाकरेंविरोधात कोणी आक्षेपार्ह शब्दात टीका केली तर त्याला अशीच शिक्षा दिली जाईल, असा इशाराही मनसैनिकांनी दिला आहे. वाचा सविस्तर

पुण्यात रिक्षाचालकांनाही ‘हेल्मेटसक्ती’!

हेल्मेट न घातल्याबद्दल रिक्षाचालकांकडूनही दंड वसूल करण्याची किमया पुणे वाहतूक पोलिसांनी करून दाखवली आहे! पुण्यात हेल्मेटसक्ती न पाळणाऱ्यांकडून मोठी दंडवसूली सुरू असल्याचे दाखवण्यासाठीच वाहतूक नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर ‘हेल्मेटनियम तोडल्याचा’ ठपका ठेवत दंडवसूली सुरू असल्याची चर्चा त्यामुळे जोर धरत आहे.

 

शहरात १ जानेवारीपासून दुचाकीचालकांना हेल्मेटसक्ती लागू झाली असून, कारवाई तीव्र करण्यात आली आहे. त्याला शहरातून विरोध होत असतानाच वाहतूक पोलिसांचा हा कारभार पुढे आला आहे. हेल्मेट घातले नाही म्हणून रिक्षाचालकांना दंडआकारणीच्या पावत्या काही दिवसांपूर्वी पाठवल्या आहेत. याबाबत रिक्षा चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत शिवनेरी रिक्षा संघटनेकडून वाहतूक पोलीस प्रमुखांची भेट घेण्यात येणार आहे.वाचा सविस्तर : 

रोहित शर्माने शेअर केला मुलीचा गोंडस फोटो

भारताचा उपकर्णधार आणि तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. रोहित शर्माची पत्नी रितिकाने 30 डिसेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला. आपल्या मुलीला भेटण्यासाठी रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून विश्रांती घेत भारतात परतला आहे. दरम्यान रोहित शर्माने आपल्या मुलीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

रोहित शर्माने शेअर केलेल्या फोटोत मुलीचा चेहरा दिसत नाही आहे. फोटोत रोहित शर्मा आणि रितिकाचा हात दिसत असून मुलीने त्यांची बोटं पकडलेली दिसत आहे. वाचा सविस्तर

‘कादर खान शेवटपर्यंत अमिताभ बच्चन यांची आठवण काढत होते’

कादर खान आणि अमिताभ बच्चन यांची मैत्री त्याकाळी बॉलिवूडमध्ये सर्वांनाच ठावूक होती. बच्चन यांच्या ‘सत्ते पे सत्ता’, ‘नसीब’ ‘मुक्कदर का सिंकदर’, ‘अग्निपथ’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी कादर खान यांनी संवादलेखन केलं.

मात्र एका प्रसंगानंतर या दोघांच्या मैत्रीला ग्रहण लागले.कालांतरानं बच्चन यांच्याशी बोलणं कादर खान यांनी टाकलं.मात्र असं असलं तरी शेवटच्या क्षणापर्यंत ते अमिताभ बच्चन यांची खूप आठवण काढत होते, असं म्हणत कादर खान यांचा मुलगा सरफराज भावूक झाला. वाचा सविस्तर