News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा पाच महत्वाच्या बातम्या

काश्मीरमधील मुलांऐवजी मलाला यांनी पाकिस्तानातील मुलींची चिंता करावी!

शाळांविषयीच्या आवाहनावर भारतातून प्रतिक्रिया

काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करून तेथील मुलांना आताच्या तणावग्रस्त परिस्थितीतून मार्ग काढून शाळेत जाण्यासाठी मदत करावी, असे आवाहन नोबेल विजेत्या पाकिस्तानी शिक्षण हक्क कार्यकर्त्यां मलाला युसुफझाई यांनी केले आहे. त्यावर भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. वाचा सविस्तर…

राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर शरद पवार भडकले

लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या दणदणीत विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडले. पवारांच्या वर्तुळातील नेत्यांसह अनेक दिग्गज नेत्यांनी हातातील घड्याळ काढून भाजपाचे कमळ हाती घेतले. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच भडकले आहेत. “ज्या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या, बेरोजगारी वाढली. त्या पक्षात काही लोक सत्तेसाठी जात आहेत”, अशा शब्दात पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांचा समाचार घेतला. वाचा सविस्तर…

शेतकरी आत्महत्याप्रकरणी शिवसेनेच्या खासदारावर गुन्हा

कट कारस्थान करून शेतकर्‍याची आर्थिक फसवणूक केल्यामुळे शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकर यांना जबाबदार धरण्यात आले आहे. ओम राजेनिंबाळकर यांच्यासह 52 जणांवर फसवणूक व शेतकर्‍यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तब्बल पाच महिन्यांनंतर उस्मानाबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शेतकरी दिलीप ढवळे यांनी आत्महत्येपूर्वी खासदार राजेनिंबाळकर यांच्यासह उध्दव ठाकरे यांच्या नावे चिठ्ठी लिहून गळफास घेतला होता. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत 12 एप्रील रोजी उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील शेतकरी दिलीप शंकर ढवळे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. वाचा सविस्तर…

ऑस्ट्रेलियाचा १३५ धावांनी पराभव, अॅशेस मालिका बरोबरीत

अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अखेरचा सामना जिंकत इंग्लंडने अॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत सोडली आहे. स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्यापुढे स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांनीसुद्धा शरणागती पत्करली. त्यामुळे पाचव्या अॅशेस कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवसीच ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. इंग्लंडने दिलेल्या ३९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव २६३ धावांत संपुष्टात आला. वाचा सविस्तर…

सुजय विखे यांच्या वक्तव्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार करू – दीपाली सय्यद

खासदार डॉ. सुजय विखे यांनी ‘देखणा माणूस’ असा उल्लेख केल्यामुळे अभिनेत्री दीपाली सय्यद या चांगल्याच संतापल्या आहेत. विखे यांनी माफी मागावी अन्यथा महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा त्यानी दिला आहे. वाचा सविस्तर…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 8:00 am

Web Title: morning bulletin top five news avb 95 10
Next Stories
1 “दीदी सांभाळून बोला, अन्यथा तुमचाही चिदंबरम करू”
2 काश्मीरमधील मुलांऐवजी मलाला यांनी पाकिस्तानातील मुलींची चिंता करावी!
3 पाकिस्तानकडून पुन्हा युद्धाची भाषा