पवारसाहेब, स्वाभिमान म्हणजे नक्की काय : शिवसेना

पवारांना गंमत वाटणे हीच मोठी गंमत

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून जाणाऱ्या नेत्यांविषयी बोलताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका सभेत स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थित केला होता. याच मुद्यावरून शिवसेनेने पवार यांना लक्ष केलं आहे. “कोणी सोडून गेले त्याची काळजी करू नका. पक्ष सोडून जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे,” असे शरद पवार म्हणतात. हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब,” असा सवाल करत शिवसेनेने पवारांच्या दिशेने बाण सोडला आहे. वाचा सविस्तर…

मेट्रो कारशेड आरेतच, दुसरी जागाच नाही!

कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाप्रमाणेच आरे मेट्रो कारशेडही जाणार, अशी विरोधी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतरही आरेमध्येच कारशेड होईल, दुसरी जागाच नाही, असे मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले. वाचा सविस्तर…

जीडीपी दर पाच टक्क्यांवर जाणं धक्कादायक! : शक्तिकांत दास

जीडीपी चा पहिल्या तिमाहीतला दर हा पाच टक्क्यांवर जाणं हा माझ्यासाठी धक्कादायकच होतं असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. “जीडीपी दर 5.5 टक्क्यांच्या खाली जाणार नाही असा अंदाज होता. मात्र समोर आलेली टक्केवारी पाहून मला धक्का बसला” असं शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. देशाचा आर्थिक विकास दर सुधारण्यासाठी सरकारने काही निर्णय घेतले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. ” विदेशी गुंतवणुकीचा दर मागच्या वर्षीच्या तुलनेत चांगला आहे, तसंच खाद्यपदार्थांची महागाई येत्या काही दिवसांमध्ये कमी होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.” वाचा सविस्तर…

अंबाती रायुडूकडे हैदराबादचं नेतृत्व, निवृत्तीनंतर दमदार पुनरागमन

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, अवघ्या काही दिवसांमध्येच यू-टर्न घेतलेल्या अंबाती रायुडूच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. आगामी विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी अंबाती रायुडूकडे हैदराबाद संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. विश्वचषक स्पर्धेत अंबाती रायुडूची भारतीय संघात निवड झालेली नव्हती. स्पर्धा सुरु झाल्यानंतर शिखर धवन, विजय शंकर दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यानंतरही अंबाती रायुडूचा भारतीय संघासाठी विचार केला गेला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या रायुडूने निवृत्तीची घोषणा केली. वाचा सविस्तर…

‘मुंबईकरांसाठी एकही दिवस गुड-डे नाही खड्डे’

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाला पावसाने झोडपले आहे तर मुंबई करांना खड्यांनी. रस्त्यावरील या खड्ड्यांना आपण शहराच्या गालावर पडलेल्या खळ्या मानले तरी खळ्या दोनच असतात. पण मुंबईमध्ये शेकडो खळ्यांमध्ये चेहरा शोधावा लागत आहे. पावसाळा आणि खड्डे हे तर राज्याचे ठरलेले समीकरण, मुसळधार पावसानंतर तर खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा असा प्रश्न वारंवार विचारला जातो. अनेक वेळा सकाळी घरातून बाहेर पडताना आजचा दिवस ‘गुड डे’ असेल असा विचार करुन आपण बाहेर पडतो. मात्र रस्त्यांवरील खड्यांमुळे हा ‘गुड डे’ कुठे मावळतो हे देखीस कळत नाही. आपण केवळ रस्त्याच्या आणि खड्ड्यांच्या नावाने बोटे मोडत असतो. पण, यावर उपाययोजना करण्यास सरकार अपयशी ठरल्याचे नेहमीच समोर आले आहे. वाचा सविस्तर…