‘नासा’चाही फोटो काढण्याचा प्रयत्न फसला?; विक्रम लँडरचे काय झाले? प्रवक्ते म्हणतात…

चांद्रयान २ मोहिमेअंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात आलेल्या विक्रम लँडरचा शोध घेण्याची शेवटची आशा धुसर झाली आहे. चंद्राभोवती फिरणाऱ्या नासाच्या ऑर्बिटरला विक्रम लँडरचा शोध लागलेला नाही. विक्रम लँडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरला ते ठिकाण नासाच्या ऑर्बिटरच्या क्षेत्रात नसल्याने ऑर्बिटरने काढलेल्या फोटोंमध्ये लँडर दिसत नसल्याची प्राथमिक शक्यता अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने व्यक्त केली आहे.

‘नासा’चे लुनार रिकन्सेन्स ऑर्बिटर (एलआरओ) हे मागील १० वर्षांपासून चंद्राच्या कक्षेत फिरत आहे. मंगळवारी हे ऑर्बिटर विक्रम लँडर ज्या भागात उतरले त्या भागावरुन गेले. मात्र या ऑर्बिटरच्या कॅमेराच्या कक्षेत विक्रम लँडर उतरलेला चंद्राचा पृष्ठभाग आला नाही. त्यामुळेच विक्रम लँडरचे फोटो मिळण्याची अपेक्षा भंग झाली आहे. वाचा सविस्तर…

मुंबई, ठाण्यात मुसळधार; शाळांना सुट्टी जाहीर

भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि रायगडमध्ये गुरूवारसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई ठाण्यासह कोकणातील शाळांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला झोडपून काढले होते. वाचा सविस्तर…

परदेश दौऱ्यावर निघालेल्या मोदींना राहुल गांधींचा मंदीवरून सवाल, म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम 22 सप्टेंबर रोजी अमेरिकेतील टेक्सासमध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील सहभागी होणार आहेत. एकमेकांना खेळकरपणे अथवा मित्रत्वाने अभिवादन करण्यासाठी अमेरिकेत हाऊडी हा शब्द वापरण्यात येतो. परंतु आता या कार्यक्रमावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींची फिरकी घेतली आहे. ‘हाऊडी’ अर्थव्यवस्थेची काय स्थिती आहे? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. वाचा सविस्तर…

Ind vs SA : हिटमॅनला मागे टाकत टी-२० क्रिकेटमध्ये कोहलीचा ‘विराट’ विक्रम

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामन्यात आपला सहकारी रोहित शर्माला मागे टाकलं आहे. नाबाद ७२ धावांची खेळी करत विराटने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याचसोबत विराट टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आपला सहकारी रोहित शर्माला दुसऱ्या स्थानी ढकललं आहे. वाचा सविस्तर…

अक्षय कुमारने केला मुंबई मेट्रोतून प्रवास, अनुभव सांगताना म्हणाला…

मुंबईकरांची जीवन वाहिनी असे रेल्वेला म्हटले जाते. अनेक वेळा पावसामुळे याच जीवन वाहिन्यांचा वेगदेखील मंदावतो. आता या रेल्वेसह मेट्रोलाही जीवन वाहिनी म्हणायला हरकत नाही. मात्र मेट्रोवर कधीच पावसाचा किंवा ट्रॅफिकचा परिणाम होत नाही. अनेक वेळा ट्रॅफिक आणि पावसापासून वाचण्यासाठी प्रवासी मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतात. असाच निर्णय बॉलिवूडच्या खिलडी अभिनेता अक्षय कुमारने घेताला आहे. ट्रॅफिकमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा कमी वेळात मेट्रोने पोहोचण्याचा निर्णय अक्षयने घेतला. वाचा सविस्तर…